28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरराजकारणनिवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील रॅली, सभांवरची बंदी वाढवली

निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील रॅली, सभांवरची बंदी वाढवली

Google News Follow

Related

पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने रॅली आणि जाहीर सभांवर बंदी घातली होती. आता ही बंदी २२ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. पुढील महिन्यापासून उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आयोगाने १५ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष सभा घेण्यास बंदी घातली होती. मात्र, आयोगाने राजकीय पक्षांना बंदिस्त ठिकाणी ३०० व्यक्तींच्या सहभागासह किंवा हॉल क्षमतेच्या ५० टक्के किंवा राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी विहित केलेल्या मर्यादेच्या अधीन अंतर्गत सभा आयोजित करण्यास परवानगी दिली आहे.

निवडणूक आयोगाने शनिवारी १५ जानेवारी रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालय, गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पाचही राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. देशातील कोरोना संसर्गाची सध्याच्या परिस्थितीचा अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. त्यानंतर २२ जानेवारीपर्यंत रोड शो, पदयात्रा, सायकल किंवा बाईक रॅलींवर बंदी कायम राहील, असे निर्देश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

आंतरजातीय विवाह केला म्हणून १५० दाम्पत्यांना केले बहिष्कृत

ब्रिटिश पंतप्रधानपदासाठी भारतीयाचे नाव का?

‘हरे रामा हरे कृष्णा’चा जप सुरूच

पाया कमकुवत झाल्यामुळे मुलाच्या डोक्यावर कोसळले झाड

देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या संकटामुळे आयोगाने सर्व राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना १५ जानेवारीपर्यंत सर्व प्रकारच्या प्रत्यक्ष रॅलींवर बंदी घातली होती. केवळ आभासी प्रचाराला परवानगी देण्यात आली होती. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राजकीय पक्षांना रॅली, सभा, पदयात्रा, सायकल यात्रा किंवा रोड शो करण्यास बंदी घालण्यात आली असून राजकीय पक्षांनी डिजिटल माध्यमातून प्रचार करावे असे आवाहन करण्यात आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा