31 C
Mumbai
Sunday, May 15, 2022
घरक्राईमनामासतीश उके यांना ६ एप्रिल पर्यंत ईडी कोठडी

सतीश उके यांना ६ एप्रिल पर्यंत ईडी कोठडी

Related

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उकेंना गुरुवार, ३१ मार्च रोजी ईडीने अटक केली होती. आता सतीश उके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाने सतीश उके यांना ६ एप्रिल पर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. सतीश उके यांच्यासह प्रदीप उके यांनाही ६ एप्रिल पर्यंत ईडीची कोठडी सुनवली आहे. मुंबई  सत्र न्यायालयाच्या पीएमएल न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सतीश उके यांना अटक करण्यात आली आहे.

गुरुवार, ३१ मार्चला सकळी पाचच्या सुमारास ईडीने सतीश उकेंच्या घरावर धाड टाकली होती. त्यानंतर पाच तासांच्या तपासानंतर सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर ईडीने उके यांना अटक केली.

सकाळी ५ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी सतीश उके यांच्या नागपुरातील पार्वती नगर येथील घरावर छापेमारी सुरू केली. यावेळी काही कागदपत्रे, मोबाईल, आणि लॅपटॉप ईडीने ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा:

रशिया युक्रेन युद्धाचा भारताला होणार दुहेरी फायदा

‘ऑनलाईन ज्ञान घेऊन ते जीवनात वापरायला हवं’ 

किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर; अनिल परबांनंतर हसन मुश्रीफ यांचा नंबर

युक्रेनचं रशियाला प्रत्युत्तर; रशियाच्या ऑईल डेपोवर हल्ला

सतीश उके हे हायप्रोफाईल वकील आहेत. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने फोन टॅपिंग प्रकरणात केस लढवली होती. नाना पटोलेंचा गावगुंड ‘मोदी’ याला सतीश उके यांनीच पत्रकार परिषद घेऊन समोर आणले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,980चाहतेआवड दर्शवा
1,882अनुयायीअनुकरण करा
9,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा