31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरराजकारणमहाराष्ट्राची सेवा करण्याची पुन्हा संधी द्या!

महाराष्ट्राची सेवा करण्याची पुन्हा संधी द्या!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले शिवाजी पार्कच्या विराट सभेत आवाहन

Google News Follow

Related

जम्मू काश्मीरमध्ये आलेल्या सरकारने प्रथमच भारताच्या संविधानानुसार शपथ घेतली. ३७० कलम आम्ही जमिनीत गाडले आहे, ते आता कुणीही वर काढू शकत नाही. जम्मू काश्मीरमधील ही स्थिती कुणामुळे निर्माण झाली तर ती तुमच्या मताच्या ताकदीमुळे. तुमच्या मताची ताकद लक्षात घेऊन पुन्हा एकदा मला महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी द्या. त्यासाठी महायुतीला साथ द्या. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी  महाराष्ट्रात महायुतीचे सरकार हवे आहे. त्यामुळेच मी कोणत्याही अडथळ्याविना आपली सेवा करत राहीन. म्हणून तुमचा आशीर्वाद मागायलला आलो आहे, अशा शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराज पार्क येथील विराट सभेत लोकांना आवाहन केले.

 

…म्हणून मुंबईची पिछेहाट

 

मोदी म्हणाले की, तुमची स्वप्ने आमचे संकल्प आहेत. मोदी तुमच्या स्वप्नांसाठी परिश्रम घेतो. ती पूर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत घेण्याची गॅरंटी देतो. आज जगातील प्रत्येक देश आपल्या शहरांना आधुनिक करत आहेत. भाजपा आणि महायुतीनेही मुंबईसाठी हेच स्वप्न पाहिले आहे. आपण किती मोठ्या प्रमाणात विकासकार्य पुढे नेत आहोत. आमचे सरकार मुंबईला कनेक्टिव्हीटीच्या समस्येतून मुक्ती देऊ इच्छिते. आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर अनेक दशके केंद्रात काँग्रेसची सरकारे राहिली. महाराष्ट्रातही काँग्रेसची सरकारे राहिली पण मुंबईबद्दल यांनी कोणताही दूरदृष्टिकोन ठेवला नाही. त्यामुळे मुंबई मागे पडली. मुंबई म्हणजे इमानदारी आणि अफाट मेहनत याचे द्योतक आहे. पण काँग्रेसची प्रतिमा अगदी याच्या उलट आहे. भ्रष्टाचार, देशाला मागे ढकलणे ही काँग्रेसची ओळख आहे.

हे ही वाचा:

हिंदुत्ववादी मते फुटू नयेत म्हणून उबाठा गटातून माघार घेणारे तनवाणी शिंदे गटात 

मालेगावात १२५ कोटींचे इंधन आले कुठून?

भास्कर जाधव म्हणाले, काँग्रेसचे सुनील केदार म्हणजे मारुतीच्या बेंबीतला विंचू!

मतदान अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या राजस्थानमधील उमेदवाराला अटक

मोदींनी लोकांना आवाहन केले की, तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की, यांनी अटल सेतू, मेट्रोचा विरोध केला. आम्ही जेव्ही डिजिटल इंडिया, यूपीआयबद्दल बोलत होतो, तेव्हा ते याची चेष्टा करत होते. अशी विचारधाररा असलेले लोक मुंबईला पुढे घेऊन जाऊ शकत नाहीत. मुंबई जोडण्यात विश्वास ठेवते पण काँग्रेस व आघाडी तोडण्याची भाषा करतात. मुंबई सगळ्या धर्माचे, भाषेचे लोक येतात पण महाआघाडीवाले जातीच्या नावावर लोकांमध्ये संघर्ष निर्माण करत आहेत. काँग्रेस दलित मागास, आदिवासींबद्दल तिरस्कार करतात. सरकार बनविण्यासाठी तडफडणारी काँग्रेस माशाप्रमाणे तडफडत आहेत. कोणत्याही परिस्थितीत ते मागास,वर्गियांमध्ये फूट पाडू इच्छितात. या जाती तुटल्या तर काँग्रेस मजबूत होईल. आज याची आवश्यकता आहे ती म्हणजे एक है तो सेफ है.

 

एका पक्षाने आपला रिमोट काँग्रेसच्या हाती दिला!

 

मोदी म्हणाले की, मुंबई बाळासाहेबांच्या सिद्धांताचे शहर आहे. मुंबई स्वाभिमानाची ओळख आहे. आघाडीत एक पक्ष असा आहे ज्यांनी बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हाती आपला रिमोर्ट कंट्रोल दिला आहे. म्हणून मी यांना आव्हान दिले होते की, काँग्रेसच्या तोंडून, त्यांच्या राजपुत्राच्या तोंडून बाळासाहेब ठाकरेंबद्दल प्रशंसेचा एखादा शब्द तरी बोलायला लावा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तरी बोलायला सांगा. तुम्ही (उद्धव ठाकरे) हे करून दाखवले तर तुम्हाला चांगली झोप येईल, हॉस्पिटलला जावे लागणार नाही. आजपर्यंत हे लोक राजपुत्राकडून बाळासाहेब ठाकरेंची प्रशंसा करवून घेऊ शकले नाहीत. किंबहुना, सावरकरांना शिव्या देणाऱ्या या लोकांच्या गळ्यात गळे घालून ते फिरत आहेत.

मोदींनी सध्याचा काळ सुरक्षित कसा आहे, हेदेखील सांगितले. ते म्हणाले, मुंबईने दहशतवादाची पीडा सहन केली आहे. अजूनही त्या जखमा ताज्या आहेत. एक वेळ अशी होती, बस, ट्रेनमध्ये प्रवास करताना भीती वाटत होती. आज आपल्या परिवाराला भेटता तरी येईल की नाही, अशी स्थिती होती. पण गेल्या काही वर्षात लोकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तेव्हा सरकार वेगळे होते आज मात्र तिथे मोदी आहेत. तुम्हाला विचार करायचा आहे की, काँग्रेस असताना दहशतवादी घटना होत असत. बेवारस बॅगबाबत सावध केले जात होते. आता हे सगळे बंद झाले की नाही?

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
207,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा