32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर राजकारण हवेत गेलेले पाय जमिनीवर आलेलं बघून बरं वाटलं

हवेत गेलेले पाय जमिनीवर आलेलं बघून बरं वाटलं

Related

सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे हे दीड वर्षांनी बाहेर पडले. तुमचे पाय सरकार आल्यापासून वर हवेत गेले आहेत. ते आता जमिनीवर येत आहेत, त्याबद्दल आनंद आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते पुण्यात बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तौक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावरुनच चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

पंतप्रधानांच्या पाहणीवेळी सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे पंतप्रधानांना हवाई पाहणी करण्याचा गुप्तचर यंत्रणांचा सल्ला होता. महाराष्ट्रातील हवामान हे पंतप्रधानांच्या पाहणी दौऱ्यासाठी योग्य नव्हते म्हणून मोदी महाराष्ट्रात आले नाहीत, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

वादळात मृत्यू झालेल्या प्रत्येकाला दोन लाख रुपयांची सरसकट मदत मोदीजींनी गुजरातमधून घोषित केली आहे. ही मदत केवळ गुजरातला केली हा प्रचार चुकीचा आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे, अशोक चव्हाणांच्या विरोधात याचिका

मिग-२१ चा पुन्हा अपघात, स्क्वाड्रन लीडरचा मृत्यू

धडधडीत खोटे बोलण्याचे धाडस, हा बहुदा सामना इफेक्ट

इस्रायल-हमासमध्ये युद्धविराम जाहीर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी चिवला बीचवरील नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले. कोकणात आलेलं चक्रीवादळ भीषण होतं. या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांसाठी जे जे काही करता येणं शक्य होईल ते करण्यात येईल. नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. पंचनामेही जवळपास झाले असून दोन दिवसात माझ्याकडे अहवाल येईल. त्यानंतर लगेचच निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

  1. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बदनामीच्या या प्रकरणात rahul gandhi या हायब्रीड राजकुमारला भरीव स्वरूपाची शिक्षा अपेक्षित आहे, जेणे करुन कुठेतरी वचक निर्माण होईल. स्वातंत्र्यवीरांनी केलेल्या चौफेर कार्याची ओळख सुद्धा या विदुषकाला नसावी, पण टकले सारखे घरभेदी काही तुकड्या साठी असा देशद्रोह करतात त्यांना त्यांचे सर्व प्रकारचे ऍक्सेस, अकाउंट्स, बंद करुन सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. स्वदेशाच्या सैनिकांवर गोळी झाडण्या तोडीचे हे कृत्य आहे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा