29 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर राजकारण नीतेश राणेंनी वादळग्रस्तांना दिली ५ हजार कौले आणि १ हजार पत्रे

नीतेश राणेंनी वादळग्रस्तांना दिली ५ हजार कौले आणि १ हजार पत्रे

Related

तौक्ते चक्रीवादळाने कोकणात हाहाकार माजवल्यानंतर असंख्य लोकांचे मोठे नुकसान झाले. घरांची झालेली पडझड, उद्ध्वस्त झालेल्या बागा यामुळे कोकणवासी पिचले आहेत. सरकारकडून आता मदतीची अपेक्षा आहे. पण त्याआधी अनेक मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत. आमदार नितेश राणे यांनी आता स्वखर्चातून छप्पर गमावलेल्या कोकणवासियांना मदत देऊ केली आहे.

हे ही वाचा:

इस्रायल-हमासमध्ये युद्धविराम जाहीर

मुख्यमंत्री केवळ बाता मारतायत

आता दरवर्षी कोवॅक्सिनचे १ अब्ज डोस

धडधडीत खोटे बोलण्याचे धाडस, हा बहुदा सामना इफेक्ट

चक्रीवादळाने सिंधुदुर्गात घरांचे छप्पर होत्याचे नव्हते झाले. काहींची कौले फुटली तर काहींच्या घरावरील सिमेंटचे पत्रेच उडून गेले. कोरोनाच्या संकटात हाताला रोजगार नसल्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या गोरगरिबांची घरे वादळाच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाली. संकटकाळात नेहमीच जिल्हावासीयांच्या मदतीला धावून जाणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी या वादळ संकटातही वादळबधितांना साथ दिली आहे. ५ हजार कौले आणि १ हजार सिमेंट चे पत्रे आमदार नितेश राणे यांनी उपलब्ध करून दिले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत घर शाकारण्यासाठीचे हे साहित्य वादळबाधितांना देण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, पं. स. सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, महेश सावंत आदी उपस्थित होते.

सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकणच्या दौऱ्यावर असून तेथील परिस्थितीची पाहणी करत आहेत. कोकणवासियांना चक्रीवादळाच्या बसलेल्या फटक्यामुळे झालेले नुकसान आणि सरकारकडून अपेक्षित मदतीबद्दल ते माहिती घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी बाता न मारता वादळामुळे पीडित असलेल्यांना त्वरित मदतीचा हात द्यावा आणि त्यांना आश्वस्त करावे अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा