34 C
Mumbai
Sunday, November 3, 2024
घरराजकारण“वेळापत्रक इतक्या दिवसात द्या अन् दोन महिन्यात निर्णय घ्या, असं आदेशात नाही”

“वेळापत्रक इतक्या दिवसात द्या अन् दोन महिन्यात निर्णय घ्या, असं आदेशात नाही”

राहुल नार्वेकरांची सुनावणीनंतर प्रतिक्रिया

Google News Follow

Related

आमदार अपात्र प्रकरणी निकाल देण्यास विलंब होत असल्यामुळे ठाकरे गट आणि शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना योग्य वेळेत कारवाई करण्याचे निर्देश दिले होती. दरम्यान, कालच्या सुनावणीवर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्या आदेशासंदर्भातील प्रत प्राप्त झाली असून त्या आदेशात जे लिहिलेले आहे त्याचे अवलोकन केल्यानंतर जी कारवाई अपेक्षित आहे ती कारवाई केली जाईल. मात्र, वेळापत्रक इतक्या दिवसात द्या आणि दोन महिन्यात निर्णय घ्या, असं कुठेही आदेशात म्हटलेलं नाही,” असे स्पष्टीकरण राहुल नार्वेकरांनी दिले आहे. त्यामुळे कोण काय म्हणत यावर लक्ष देत नसून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात जे लिहिलं आहे त्याची दखल घेणार आणि त्या अनुषंगाने कारवाई करण्याची कायदेशीर सल्ला मी घेत आहे, असंही राहुल नार्वेकर म्हणाले.

राहुल नार्वेकर म्हणाले, “ज्या गोष्टींचा कोर्टाने आदेशात उल्लेख केला नाही त्या गोष्टींबाबत दखल घेणं मी योग्य समजत नाही. यापूर्वी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपल्या संविधानामध्ये  न्याय मंडळ, कार्यकारी मंडळ व विधिमंडळला तिघांनाही समान स्थान दिले आहे. कोणाचेही कोणावर सुप्रिटेंडन्ट नाहीये असं असताना कोर्टाचा आदर ठेवून किंवा संवेधानातून निर्माण झालेल्या इतर संस्थांचा आदर ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.”

हे ही वाचा:

एकतर अंत्ययात्रा निघेल किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची विजययात्रा निघेल

कॅनडात तीन हिंदू मंदिरांची तोडफोड आणि चोरी

भारत पाक सामन्यात स्विगी, झोमॅटोकडून भारताला अनोख्या शुभेच्छा

इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये हमासच्या एरियल फोर्सचा प्रमुख ठार

“ज्या व्यक्तीला सद्य लोकशाहीवर विश्वास आहे. तो निश्चितपणे संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांचा मान राखेल. संविधानावर पूर्ण विश्वास असल्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा आणि न्यायालयाचा मान राखणं हे कर्तव्य असून ते पार पाडणार,” असे राहुल नार्वेकर म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा