27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरराजकारण“माफिया सरकारचे दिवस भरले”

“माफिया सरकारचे दिवस भरले”

Related

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे. अशातच शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे काही आमदारांसह गुजरातमध्ये गेल्याची माहिती आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटले आहे की, शिवसेनेला (माफिया सेनेला) ५२ मतं मिळाली. १२ मतं फुटली (५५ शिवसेना + ९ समर्थक = ६४) उद्धव ठाकरे सरकारचे बारा वाजणार हे निश्चित. विधान परिषद निवडणूक निकाल म्हणजे ठाकरे सरकारचा निकाल उद्धव ठाकरे यांचा माफिया सरकारचे दिवस भरले, असे ट्वीट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे २८ आमदार फुटले

१३ आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल; ठाकरे सरकार अडचणीत

“पराभवानंतर सरकार म्हणून विचार करण्याची गरज”

‘वाझेला सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री- देशमुखांचा दबाव’

विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे. महाविकास आघाडीची २१ मतं फुटल्यानंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह २८ आमदार फुटल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे ठाकरे सरकार पडणार असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,925अनुयायीअनुकरण करा
16,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा