29 C
Mumbai
Sunday, June 16, 2024
घरराजकारणमतपेटीमध्ये ठरणार आज कोणाचा होणार जय

मतपेटीमध्ये ठरणार आज कोणाचा होणार जय

शिक्षक आणि पदवीधर मदारसंघांच्या मतमोजणीला सुरुवात,

Google News Follow

Related

पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघासाठी मतमोजणीला आता सुरवात झाली आहे. सत्यजित तांबे, शुभांगी पाटील यांच्यासह सोळा उमेदवारांचे भविष्य आज मतपेटीमध्ये ठरणार आहे. एकूण दोन लाख ६२ हजार ६७८ पैकी एक लाख २९ हजार ४५६ मतदारांनी यासाठी हक्क बजावला होता. आता सकाळी आठ पासून मतमोजणी सुरु झाली असून लवकरच निकालाचे चित्र स्पष्ट होईल. मतमोजणी केंद्रावर एकूण अडीचशे पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.   या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा मुख्य मुद्दा जुनी पेंशन योजना हा आहे.

आत्ता मतमोजणीला सुरवात होतानाच आपल्याला सत्यजित तांबे यांच्या विजयाचे पोस्टर्स सगळीकडे लागलेले दिसत आहेत. एकूण पाच ठिकाणी नाशिक, अमरावती, कोकण , नागपूर, आणि औरंगाबाद या मतदार संघाचा निकाल आज लागणार आहे. एकूणच हि मतदानाची लढाई चुरशीची होणार असे दिसत आहे. या सर्व च्या सर्व मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होत आहे. म्हणूनच सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या रणधुमाळीत कोण विजयी होणार याकडे लक्ष सर्वांचे लागले आहे.  या मतदानामध्ये आधी पोस्टल स्वरूपातील मतमोजणी सुरु राहील याच पोस्टल मतदानात कोणाचा कौल आहे ते प्रथम सगळ्यांना बघायला मिळणार आहे तेव्हाच थोडे फार चित्र स्पष्ट होईल.

बघूया कोण विरुद्ध कोण ?
पहिला नाशिक मतदारसंघ यात माविआच्या शुभांगी पाटील , अपक्ष  उमेदवार सत्यजित तांबे , वंचितचे रतन बनसोडे यांची लढत होणार आहे ,सत्यजित तांबे यांनी या निवडणुकीत काँग्रेस विरोधात बंडखोरी केल्यामुळे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
दुसरा नागपूर शिक्षक मतदार संघ यात चौरंगी लढत होणार आहे. नागपूरमध्ये काँग्रेसचे सुधाकर आडबाले, शिक्षक भारतीकडून राजेंद्र झाडे, राष्ट्रवादीचेबंडखोर उमेदवार सतीश इटकेलवार लढण्यासाठी तयार आहेत. तर अपक्ष म्हणून नागो गाणार हे निवडणुकीला उभे आहेत.  तिसऱ्या कोकण शिक्षक मतदार संघात माविआचे बाळाराम पाटील उमेदवार तर त्यांच्या विरोधात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे अशी चुरशीची लढत होणार आहे.

हे ही वाचा:

माझ्या हत्येचा कट  रचला जात आहे

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”

हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडक

जेरुसलेमच्या प्रार्थनास्थळात घुसुन दहशत वाद्यांचा गोळीबार

चौथ्या  मराठवाडा शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीतून विक्रम काळे , राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार म्हणून प्रदीप साळुंखे आहेत तर भाजपचे उमेदवार म्हणून किरण पाटील लढत आहेत. पाचवा मतदार संघ अमरावतीकडून भाजपचे उमेदवार रणजित पाटील आणि माविआ चे धीरज लिंगाडे अशी लढत असणार आहे. अमरावती पदवीधर मतदार संघासाठी एकूण अकोला, बुलढाणा, वाशीम., यवतमाळ या पाच जिल्हयातून मतदान झाले आहे. दरम्यान या निवडूणुकींच्या निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान सत्यजित तांबे हे कालपासूनच  अज्ञात  स्थळी गेल्यामुळे सध्या भरपूर चर्चा होत असून तांबे हे दुपारी तीन वाजता  मतमोजणीच्या ठिकाणी येणार असल्याचे कळते.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा