27 C
Mumbai
Monday, September 26, 2022
घरराजकारणनितिशकुमारांना धक्का; मणिपूरमध्ये जदयूचे पाच आमदार भाजपमध्ये

नितिशकुमारांना धक्का; मणिपूरमध्ये जदयूचे पाच आमदार भाजपमध्ये

मणिपूर विधानसभेत ६ जागी जदयू जिंकले होते त्यातील ५ जण भाजपात आले

Related

मणिपूरमधील जदयूचे पाच आमदार सत्ताधारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. या नव्या राजकीय घडामाेडीमुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्ष जदयू पक्षाला मणिपूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. के.एच जॉयकिशन, एन. सनाते, मोहम्मद अछाबुद्दीन, माजी पोलीस महासंचालक एएम खौटे आणि थंगजाम अरुण कुमार हे पाच आमदार भाजपवासी झाले आहेत. ए.एम. खाऊटे आणि थांगजाम अरुण कुमार यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडे तिकीट मागितले हाेते. परंतु ते मिळण्यात अपयशी ठरल्यावर त्यांना जदयूमध्ये प्रवेश करावा लागला हाेता.

मणिपूर विधानसभेचे सचिव के मेघजित सिंग यांनी विधान जारी करताना अध्यक्षांनी संविधानाच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत जेडीयूच्या पाच आमदारांचे भाजपमध्ये विलीनीकरण स्वीकार केलं असल्याचं म्हटलं आहे. या वर्षी मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जदयूने ३८ जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यापैकी सहा जागा जिंकल्या. यापैकी आता ५ आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. एक आमदार अजूनही जेडीयूमध्ये आहे.

२०१९ मध्ये झालेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत जेडीयूने सात जागा जिंकल्या होत्या. निवडणुकीच्या निकालात भाजपनंतर जेडीयू राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ४१ जागा जिंकल्या होत्या. मात्र, नंतर जेडीयूचे ६ आमदार भाजपमध्ये दाखल झाले.

हे ही वाचा:

केजरीवाल विसरले ती लिकर पॉलिसी

नवे नौदल चिन्ह, मोदी आणि पिवळे इतिहासकार

‘एनआयए’ने दाऊद इब्राहिमची लायकीच काढली

‘राज साहेब आपल्या परखड वक्तृत्वाची महाराष्ट्र वाट पाहतोय’

नितीश कुमार यांनी गेल्या महिन्यातच बिहारमध्ये भाजपशी संबंध तोडले हे लक्षात घेण्यासारखे आहे. भाजपने आपला अपमान केला आणि जेडीयू तोडल्याचा आरोप करत नितीशकुमार यांनी एनडीएपासून दुरावले. यानंतर नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूने आरजेडीच्या नेतृत्वाखालील महाआघाडीशी हातमिळवणी केली. महाआघाडीच्या नव्या सरकारमध्ये नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती .

नऊ दिवसातील दुसरा धक्का

मात्र, एकीकडे नितीशकुमार राष्ट्रीय राजकारणात जाणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, भाजप त्यांच्या पक्षात सतत कुरघोडी करत आहे. गेल्या नऊ दिवसांतील जेडीयूला हा दुसरा धक्का आहे. यापूर्वी २५ ऑगस्ट रोजी अरुणाचल प्रदेशमधील जेडीयूचे एकमेव आमदार टेकी कासो यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,943अनुयायीअनुकरण करा
40,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा