28 C
Mumbai
Tuesday, September 27, 2022
घरक्राईमनामासिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर त्याच्या वडिलांना धमकी

सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर त्याच्या वडिलांना धमकी

लॉरेन्स बिष्णोईकडून त्याच्या वडिलांना 'मुलापेक्षा वाईट अवस्था करू' अशी धमकी

Related

पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर गुंडांनी आता त्याच्या वडिलांना लक्ष्य केले आहे. मूसेवालाचे वडील बलकौर सिंग यांना कुख्यात गँगस्टर लॉरेन्स गँगकडून धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स गँग शूटरच्या नावाने पाठवलेल्या मेलमध्ये मूसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी लॉरेन्स आणि जग्गू भगवानपुरिया यांच्या सुरक्षेवर काहीही बोलू नये, असे म्हटले आहे.

सोपू ग्रुपचा हा इशारा आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मेलमध्ये लिहले की, सिद्धू मुसेवालाचे वडील हे लक्षात घ्या, लॉरेन्स, जग्गू भगवानपुरिया या आमच्या भावांच्या सुरक्षेबाबत काही बोललात तर तुम्हाला कधी मारून जाऊ हे कळणारही नाही. तुम्ही आणि तुमचा मुलगा या देशाचे मालक नाहीत, की ज्याला पाहिजे त्याला संरक्षण मिळेल. मूसावालाचे मारेकरी जगरूप रूपा आणि मनप्रीत मन्नू यांची एन्काउंटरही त्यांच्याच दबावाखाली झाल्याचे या टोळीने म्हटले आहे. धमकीची माहिती मिळताच पंजाब पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शूटर एजे लॉरेन्सच्या नावाने ही धमकी सिद्धू मूसवालाच्या ई-मेल आयडीवर पाठवण्यात आले होते.

हे ही वाचा:

‘भविष्यातील आव्हानांना भारताचं उत्तर म्हणजे विक्रांत’

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘विविधतेत एकता’ उत्सव

महाराष्ट्र काँग्रेसमधील जी-२२ मुळे खोळंबला मंत्रिमंडळाचा विस्तार

मदरशातून देशविरोधी कृत्य झाले तर याद राखा

तुमच्या मुलाने आमच्या भावाना मारले आणि आम्ही तुमच्या मुलाला मारले. मनप्रीत मन्नू आणि जगरूप रूपा यांची बनावट चकमक आम्ही विसरलो नाही. तुम्ही देखील विसरू नका कारण हे सर्व तुमच्या दबावाखाली घडले आहे. शंभर गोष्टींपैकी एक गोष्ट, जर तुम्ही जास्त बोललात तर तुमची अवस्था सिद्धूपेक्षा वाईट होईल. अशी धमकी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्नोईकडून देण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,965चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
40,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा