बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडेंना तातडीने राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी क्रौर्याची परिसीमा गाठणारे फोटो आरोपपत्रातून समोर आले होते. या आरोपपत्रातील फोटो व्हायरल झाल्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री धनंजय मंडे, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा :
बैठकीत झालेल्या बाचाबाचीनंतर ट्रम्प यांनी युक्रेनची लष्करी मदत थांबवली
आयआयटी बाबा अभय सिंहकडे सापडले गांजाचे पाकीट!
अलाहाबादियाला पश्चात्ताप होईल अशी आशा व्यक्त करत पॉडकास्ट सुरू करण्यास परवानगी!
डिसेंबर महिन्यात संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींवर माकोका अंतर्गत कारवाई सुरू आहे. या प्रकरणी तपासासाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापना केली होती शिवाय सीआयडीकडही तपास सुपूर्द केला होता. शनिवारी या प्रकरणात सीआयडीने १८०० पानी आरोपपत्र दाखल केलं. यात धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी म्हणून संबोधण्यात आले आहेर. दरम्यान, विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाचं हत्या प्रकरणातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. याआधी सुद्धा याच मुद्यावरुन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करण्यात आली होती.