भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या षष्ठ्यब्दीनिमित्त शनिवारी एका खास कार्यक्रमात राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एका हॉटेलमध्ये साठाव्या वाढदिवसानिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशीष शेलार, आमदार मनीषा चौधरी यांनी विशेष उपस्थिती दर्शवत आ. अतुल भातखळकर यांचे अभिनंदन केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार भातखळकर यांचे अभिनंदन केले तसेच त्यांच्या साधेपणा व कार्यकुशलतेचे कौतुक केले. नंतर आमदार भातखळकर, त्यांच्या पत्नी रश्मी भातखळकर यांच्याशी त्यांनी संवादही साधला. आशीष शेलार हे सपत्नीक आमदार भातखळकर यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
हे ही वाचा:
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने केला झेल सोडण्याचा विक्रम
रोहित सलग बारा वेळा टॉस हरला; ब्रायन लाराशी बरोबरी!
इंडियन वेल्स: ५ वेळा चॅम्पियन जोकोविच पहिल्याच सामन्यात पराभूत
यावेळी एका मराठी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. आमदार अतुल भातखळकर यांचे भारतीय जनता पक्षातील नेते, कार्यकर्ते, शालेय, महाविद्यालयीन जीवनातील मित्रमंडळी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरही यावेळी आवर्जून उपस्थित होती.