भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या शरीराच्या आकारावरून आणि त्याच्या फिटनेसवर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारताच्या विजेतेपदानंतर ताळ्यावर आल्या आणि त्यांनी रोहित शर्माचे कौतुक केले.
शमा मोहम्मद यांनी म्हटले की, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. कर्णधार रोहितचेही अभिनंदन त्याने ७६ धावांच्या खेळीसह भारताच्या विजयाचा पाया रचला. श्रेयस आणि के.एल. राहुल यांनीही महत्त्वाची खेळी केली. हा विजय नेहमीच लक्षात राहील.
कर्नाटका : हंपी अत्याचार प्रकरणी दोघांना अटक, तिसऱ्याचा शोध सुरु!
सीरियन सैन्य आणि असद समर्थकांमध्ये संघर्ष, दोन दिवसात एक हजार लोकांचा मृत्यू!
ऑटिस गिब्सन केकेआरचे सहाय्यक प्रशिक्षक
३ मार्चला याच शमा मोहम्मद यांनी रोहित शर्मा एक लठ्ठ असून कर्णधार म्हणून भारताच्या इतिहासातील प्रभावी नसलेला कर्णधार आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या. त्यावरून देशभरात त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. काँग्रेसने मात्र त्यांच्या त्या वक्तव्याचे समर्थन केले नाही.
शमा मोहम्मद यांनी एक्सवर केलेल्या या पोस्टनंतर त्यावर अनेकांनी टिप्पणी करत त्यांची खिल्ली उडविली आहे. आधी अनफिट म्हणाल्यानंतर आता त्याच रोहितचे अभिनंदन करावे लागल्याचे काही युजर्सनी म्हटले आहे.