वाल्मिक कराड गेला आणि खोक्या भोसले चर्चेत आला. तेवढाच निर्ढावलेला, तेवढाच क्रूर. बीडचे राजकारण पाहील्यानंतर आता असा संशय येऊ लागलाय की इथे झालेला राजकीय राडा ‘ आका‘ बनण्यासाठी तर नव्हता? सनी देओल च्या सुपरहीट अर्जून सिनेमाची स्क्रीप्ट जशीच्या तशी बीडमध्ये साकारलेली नाही ना? बीडच्या गुन्हेगारी राजकारणाचा बाजार उठवायचा असेल तर इथे सगळ्या छोट्या-मोठ्या आकांचा हिशोब करण्याची गरज आहे. नाही तर इथे सर्वसामांन्यांचे राजकीय बळी सुरू राहतील.