27 C
Mumbai
Wednesday, August 17, 2022
घरराजकारणरूमचं छत कोसळलं, आमदार शहाजी बापू बचावले

रूमचं छत कोसळलं, आमदार शहाजी बापू बचावले

Related

शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडावी म्हणून मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि अनेक आमदारांनी बंड पुकारले होते. त्यावेळी त्या आमदारांमधील शहाजीबापू पाटील आमदार हे एका डायलॉगने राज्यात प्रसिद्ध झाले. हेच शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले आहेत. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील आमदार शहाजी बापू पाटील यांच्या रूमच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे.

आकाशवाणी आमदार निवासात शहाजीबापू पाटील यांची खोली आहे. त्यांच्या या खोलीच्या छताचा बुधवारी मध्यरात्री काही भाग कोसळला आहे. शहाजीबापू पाटील हे घटनेवेळी आपल्या खोलीतच होते पण या अपघातातून ते थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या खोलीतील बेडवर सिलिंगचा मोठा भाग पडल्याचं दिसून आलं. या घटनेनंतर त्यांच्या रूमचे फोटोही समोर आले आहेत. ही घटना मोठी होती, हे फोटोवरून दिसून येत आहे. पण ते सुरक्षित आणि सुखरूप असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला

 

पोलिसांनी तेलंगातील तीन पीएफआय कार्यकर्त्यांना केली अटक

उद्धव ठाकरेंना भेटायला आलेल्या शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

पवईतील हिरानंदानी मॉलमध्ये भीषण आग

‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल एकदम ओक्केमध्ये आहे,’ ह्या एका डायलॉगाने महाराष्ट्रात शहाजीबापू पाटील प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या ह्या डायलॉगवर गाणं देखील करण्यात आलं होत. शहाजीबापू पाटील यांच्या पत्नीनेदेखील हा डायलॉग म्हटलं होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,914चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा