29 C
Mumbai
Sunday, July 25, 2021
घरराजकारणप्रताप सरनाईक मातोश्रीवर?

प्रताप सरनाईक मातोश्रीवर?

Related

ठाण्यातील ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे गायब झाल्याची तक्रार त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी नोंदवली आहे. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ही तक्रार करण्याआधी भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमैय्या आणि भाजपा ठाणे जिल्हा तसेच अध्यक्ष कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वात ठाणे भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना किरीट सोमैय्या यांनी प्रताप सरनाईक मातोश्रीवर लपले असल्याची चर्चा रंगल्याचे सांगितले.

ठाण्यातील ओवळा-माजिवडा मतदारसंघातून निवडून येणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या काही महिन्यांपासून ‘आऊट ऑफ रिच’ झाले आहेत. सरनाईक हे ईडीच्या रडारवर आल्यापासून ते गायब झाले आहेत. कोविडच्या या कठीण काळात जेव्हा मतदारसंघातील नागरिकांना लोकप्रतिनिधींची आणि त्यांच्या कार्याची प्रकर्षाने आवश्यकता भासत आहे तेव्हा ओवळा-माजिवडा मतदार संघातील नागरिकांसाठी त्यांचे आमदार जागेवर नाहीयेत. ते गायब होवून आता अनेक दिवस झाले. ते कुठे हरवले आहेत? असा उगाच संशय निर्माण होत आहे. किंवा त्यांना कुणी गायब केले आहे का? या सर्व बाबींचा तपास करून आमदार सरनाईक यांचा शोध घ्यावा यासाठी ठाण्यातील वर्तक नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

…तर ‘सामना’च्या ऑफिसमध्ये येऊन ‘प्रसाद’ देईन

फिरायला जाणाऱ्यांना पुन्हा पुण्यात आल्यावर १५ दिवसांचा क्वॉरंटाईन

ठाकरे सरकार संविधानिक हक्कांवर गदा आणत गळा घोटण्याचं काम करतंय

शिवसेना आमदाराचा फुकट पेट्रोल भरण्याचा भिकारीपणा

प्रताप सरनाईक यांच्या मतदार संघातील स्थानिक मतदार मिलिंद नईबागकार आणि हरीश जोशी यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात सरनाईक गायब असल्याबद्दल तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक हे मातोश्रीवर लपले असल्याची चर्चा रंगल्याचे सांगितले आहे.

तर या संदर्भातच ठाणे भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी भाजपतर्फे सरनाईक यांच्याविरोधात फलक झळकवण्यात आले असून ‘आमदारांचे प्रताप नागरिकांना मनस्ताप अशा घोषणा देण्यात आल्या’ तर त्यासोबतच ‘मिस्टर इंडिया झालेल्या आमदारांना शोधून आणा’ असेही म्हटले गेले. या आंदोलनात किरीट सोमैय्या आणि निरंजन डावखरे यांच्या सह जेष्ठ नगरसेवक संजय वाघुले, सीताराम राणे, तसेच ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सारंग मेढेकर हे देखील सहभागी झाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,287अनुयायीअनुकरण करा
2,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा