30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणसर्जिकल स्ट्राईक ते तिहेरी तलाक : निर्णय घेणारे सक्षम सरकार

सर्जिकल स्ट्राईक ते तिहेरी तलाक : निर्णय घेणारे सक्षम सरकार

Google News Follow

Related

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला मंगळवारी संसदेच्या नवीन सेंट्रल हॉलमध्ये सुरुवात झाली आहे. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना द्रौपदी मुर्मू म्हणाल्या सर्जिकल स्ट्राईकपासून ते दहशतवादाच्या विरोधात कठोर कारवाई आणि नियंत्रण रेषेवरील प्रत्येक गैरप्रकाराला चोख प्रत्युत्तर, कलम ३७० हटवण्यापासून ते तिहेरी तलाकपर्यंत, माझ्या सरकारची निर्णाय घेणारी सरकार म्हणून ओळख झाली आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून मी देशवासीयांचे आभार मानतो की त्यांनी सलग दोन वेळा स्थिर सरकार निवडून दिले. माझ्या सरकारने नेहमीच देशाचे हित सर्वोपरि ठेवले, धोरण आणि रणनीतीमध्ये संपूर्ण बदल करण्याची इच्छाशक्ती दाखवली असेही राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाल्या .

राष्ट्रपती आपल्या भाषणात संबोधित करतांना पुढे म्हणाल्या की , अमृतकालचा हा २५ वर्षांचा कालखंड म्हणजे स्वातंत्र्याचे सुवर्ण शतक आणि विकसित भारत घडवण्याचा काळ आहे . ही २५ वर्षे आपल्या सर्वांसाठी आणि देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या कर्तव्याची पराकाष्ठा करण्याची होती.सरकारच्या जवळपास ९ वर्षांच्या काळात भारतातील जनतेने प्रथमच अनेक सकारात्मक बदल पाहिले आहेत. आज प्रत्येक भारतीयाचा आत्मविश्वास शिखरावर आहे आणि जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे हा सर्वात मोठा बदल झाला आहे.

असा भारत बनवायचा आहे जो स्वावलंबी असेल
आपल्यासाठी एक युग निर्माण करण्याची संधी आहे. आपल्याला असा भारत बनवायचा आहे जो स्वावलंबी असेल आणि जो आपली मानवी जबाबदारी पार पाडू शकेल, ज्यामध्ये गरिबी नाही, ज्याचा मध्यमवर्गही वैभवाने भरलेला असेल. ज्यांची युवाशक्ती, स्त्रीशक्ती समाजाला आणि राष्ट्राला दिशा देण्यासाठी उभी आहे. असे सांगून राष्ट्रपती म्हणाल्या की, जो भारत एकेकाळी आपल्या समस्या सोडवण्यासाठी इतरांवर अवलंबून होता, तोच भारत आज जगाच्या समस्या सोडवण्याचे माध्यम बनला आहे. ज्या सुविधांसाठी देशातील मोठ्या लोकसंख्येने अनेक दशके वाट पाहिली, त्या सुविधा त्यांना वर्षांत मिळाल्या आहेत.

हे ही वाचा:

दिलासा..चारधाम यात्रेसाठी जोशीमठ सुरक्षित

अनिल परब यांचे कार्यालय तोडले, किरीट सोमय्या भेट देणार

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या अर्थसंकल्पाकडे साऱ्या जगाचे लक्ष

…अदानींमुळे म्हणे LIC बुडाली!

भेदभाव न करता प्रत्येक वर्गासाठी काम
सध्याच्या सरकारने कोणताही भेदभाव न करता प्रत्येक वर्गासाठी काम केले आहे. सरकारच्या गेल्या काही वर्षांतील प्रयत्नांमुळे अनेक मूलभूत सुविधा एकतर १०० टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचल्या किंवा त्या लक्ष्याच्या अगदी जवळ असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात पंचप्राणांच्या प्रेरणेने देश पुढे जात आहे. माझे सरकार गुलामगिरीच्या प्रत्येक चिन्हातून, प्रत्येक मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. पूर्वी जो राजपथ होता तो आता कार्तीपथ झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा