27 C
Mumbai
Wednesday, September 28, 2022
घरराजकारणहिंदूंचा द्वेष करणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरूसह राहुल गांधींचा 'सुसंवाद'

हिंदूंचा द्वेष करणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरूसह राहुल गांधींचा ‘सुसंवाद’

Related

भारत जोडो अभियानात पदयात्रा काढता काढता राहुल गांधी यांनी येशूख्रिस्त हा कोण होता यावर तामिळनाडूच्या एका वादग्रस्त आणि हिंदूद्वेष्ट्या ख्रिस्ती धर्मगुरूकडून शंकांचे निरसन करून घेतले तो व्हीडिओ आता व्हायरल झाला आहे. तामिळनाडूच्या कन्याकुमारीतील हा हिंदूविरोधी धर्मगुरू जॉर्ज पोनय्या राहुल गांधी यांना सांगतो की, येशूख्रिस्त हा खरा देव आहे आणि त्यांनी मानवाच्या रूपात दर्शन दिले आहे. इतर शक्तीवगैरेसारखा तो नाही.

हे सांगताना हिंदू धर्मातील शक्तीची तो बदनामी करतो आणि राहुल गांधी ते ऐकून घेतात. राहुल गांधी या धर्मगुरूला विचारतात की, येशूख्रिस्त हे देवाचे रूप आहेत की तो देवच आहेत. त्यावर तिथे उपस्थित असलेले अनेक लोक वेगवेगळी मते व्यक्त करतात. त्यातील राहुल गांधी यांच्या उजव्या बाजूला बसलेले गृहस्थ म्हणतात की, येशू हा देवाचा पुत्र आहे आणि म्हणून तोच देव आहे. दुसरी व्यक्ती म्हणते की, येशूख्रिस्त हे पाण्याप्रमाणे आहेत ते स्थायू, द्रव आणि वायू अवस्थेत असतात.

हे पॅस्टर पोनय्या वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहेत. कन्याकुमारीतील एका एनजीओचे ते सदस्य आहेत. त्यांनी मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही अश्लाघ्य भाषेत टीका केली होती आणि त्यासंदर्भात त्यांच्यावर ३० तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर पॅस्टर पोनय्या याने जाहीर माफी मागितली होती.

१८ जुलैला गेल्या वर्षी पॅस्टर पोनय्या याने भारतमातेवर अभद्र टिप्पणी केली होती. कन्याकुमारीत सार्वजनिक सभेत याच पॅस्टर पोनय्याने भाजपाचे उमेदरावर एम.आर. गांधी यांनी चप्पल न घातल्याबद्दल त्यांची थट्टा उडविली होती. भारतमातेप्रति आदर म्हणून गांधी यांनी चप्पल घातली नव्हती. त्यावर पोनय्या म्हणतो की, भारतमाता ही विटाळलेली आहे. आपण दूषित होऊ नये म्हणून आम्ही पायात बूट घालतो. तामिळनाडू सरकारने आम्हाला मोफत पादत्राणे पुरविली आहेत. ही भूमी धोकादायक आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींच्या ४१ हजार रुपयांच्या टी शर्टची चर्चा

पिंपरीत गायब झालेल्या मुलाची हत्या

जम्मू आणि काश्मीर पुनर्वसन योजना लागू

‘याकुब मेमनचा भाऊ रौफसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या?’

 

एवढेच नव्हे तर पोनय्या याने तामिळनाडूतील हिंदू धर्मियांना धमकावलेही होते. तो म्हणाला होता की, आम्ही आता बहुसंख्य आहोत. कन्याकुमारी जिल्ह्यात आता आमची संख्या ६२ टक्के आहे लवकरच ती ७० टक्के होईल. तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही. मी हिंदू बांधवांना इशारा देतो आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दलही त्याने अत्यंत खालच्या भाषेत विधाने केली. मोदी आणि अमित शहा यांचे अखेरचे दिवस वाईट असतील. जर देव अस्तित्वात असेल तर या दोघांनाही किडे पडतील. अशा प्रकारची विधाने या पॅस्टरने केली आहेत. या विधानानंतर पॅस्टरविरोधात तक्रारी करण्यात आल्या. त्यावर हा पोनय्या लपून बसला. कन्याकुमारी पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी पथके रवाना केली. शेवटी मोबाईलच्या सिग्नलमुळे त्याला मदुराई जिल्ह्यातून अटक करण्यात आली.

यासंदर्भात मग भाजपाने राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. भारत जोडोसोबत भारत तोडो या वाक्याने भाजपा प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,941अनुयायीअनुकरण करा
40,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा