29 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरक्राईमनामानरबळीसाठी नांदेडमध्ये तरुणाची हत्या झाल्याचा संशय

नरबळीसाठी नांदेडमध्ये तरुणाची हत्या झाल्याचा संशय

नांदेड येथील हिमायतनगरमधील वाशीच्या जंगलात एका युवकाची हत्या केल्याचे समोर आले आहे.

Google News Follow

Related

नांदेड येथील हिमायतनगरमधील वाशीच्या जंगलात एका युवकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. तसेच मृतदेहाशेजारी लिंबू, तांब्या, फुले आढळल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा नातेवाईकांचा संशय आहे. पांडुरंग लक्ष्मण तोटेवाड असं मृत व्यक्तिचं नाव असून या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हिमायतनगर शहरातील युवक पांडुरंग लक्ष्मण तोटेवाड (रा. लाकडोबा चौक) याचा मृतदेह हिमायतनगर- तालुक्यातील तेलंगणा बॉर्डरवर असलेल्या वाशीच्या जंगलात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. मयत युवक हा आपल्या घराशेजारी बसलेला असताना आरोपींनी त्याला बोलावून वाशीच्या जंगल भागात नेऊन इतर साथीदाराच्या मदतीने दगडाने ठेचून खून केला. दरम्यान सदर खून अपघात असल्याचे भासविण्यासाठी त्याचा चेहरा विद्रुप केला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.

दरम्यान त्या मृतदेहाच्या शेजारी लिंबू, तांब्या आणि फुले दिसत असल्याने हा प्रकार नरबळीचा असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हिमायतनगर येथील पांडुरंग लक्ष्मण तोटेवाड या तरुणाचा मृतदेह तेलंगणा बॉर्डरवरील वाशीच्या जंगलात आढळून आला. दगडाने ठेचून मारेकऱ्यांनी निघृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी एका महिलेसह तीन पुरुषांवर गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींच्या ४१ हजार रुपयांच्या टी शर्टची चर्चा

‘याकुब मेमनचा भाऊ रौफसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या?’

विसर्जन घाटावर जनरेटरची वायर तुटून ११ भाविक जखमी

चीनचे सैनिक या भागातून चाललेत मागे

याबाबत बालाजी तोटेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी परमेश्वर लक्ष्मण अक्कलवाड, लक्ष्मण अक्कलवाड, रमेश लक्ष्मण अक्कलवाड, लक्ष्मीबाई लक्ष्मण अक्कलवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपींविरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३४ भादंवि अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा