28 C
Mumbai
Monday, October 3, 2022
घरविशेषराष्ट्रपती द्रौपदी मुर्मूं यांच्या भेटीचे फोटो कंगनाने केले शेअर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूं यांच्या भेटीचे फोटो कंगनाने केले शेअर

Related

अभिनेत्री कंगना राणौतने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. भेटीचे फोटो कंगना राणौतने सोशल मीडियावर शेअर केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटून आनंद झाल्याचे कंगना राणौतने सांगितले आहे.

कंगना राणौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये कंगना राष्ट्रपतींना पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत. इंस्टाग्रामवरून फोटो शेअर करत कंगना रणौतने लिहिले, माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटून आनंद झाला आहे. त्यांना भेटणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती झाल्या तेव्हा कंगना राणौतने त्यांचे अभिनंदन केले होते. देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती झाल्या त्यामुळे त्यांचं अभिनंदनसुद्धा कंगनाने केलं होते.

हे ही वाचा:

विसर्जन घाटावर जनरेटरची वायर तुटून ११ भाविक जखमी

चीनचे सैनिक या भागातून चाललेत मागे

राणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा दुखवटा

याकुब मेमन कबर प्रकरणात मुख्यमंत्री काय म्हणाले?

दरम्यान, मणिकर्णिका, धाकड या चित्रपटात काम करणाऱ्या सध्या कंगना राणौत तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या तयारीत व्यस्त असल्याची माहिती आहे. या चित्रपटात कंगना देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहेत. कंगना रणौत केवळ फिल्मी दुनियेतच सक्रिय नाही, याशिवाय ती तिच्या स्पष्टवक्ते वक्तव्यांसाठीही ओळखली जाते. कंगना बॉलीवूडपासून ते राजकीय विषयांवर खुलेपणाने आपले मत व्यक्त करताना दिसते आणि सतत चर्चेत असते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,945अनुयायीअनुकरण करा
41,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा