27 C
Mumbai
Saturday, June 25, 2022
घरराजकारण'उद्धव ठाकरेंच्या अंगावर एक तरी आंदोलनाची केस आहे का?'

‘उद्धव ठाकरेंच्या अंगावर एक तरी आंदोलनाची केस आहे का?’

Related

राज ठाकरे यांनी विचारला सवाल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा ५ जूनचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्यानंतर रविवार, २२ मे रोजी पुण्यात सभा घेणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या सभेत राज ठाकरे कोणत्या मुद्द्यांवर बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.

राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची सभा झाली त्यात मुख्यमंत्री म्हणतात यांच हिंदुत्व खोटं आहे आणि आमचं खरं आहे. हा काय पोरकटपणा आहे. हिंदुत्व म्हणजे काय वॉशिंग पावडर आहे का? कोणाचं किती शुभ्र याची स्पर्धा सुरू आहे, असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. मनसेचं एक आंदोलन दाखवा जे अर्धवट सोडलं आहे. टोल नाक्याचं आंदोलन हातात घेतलं त्यानंतर राज्यातील काही टक्के टोलनाके बंद झाले. पाकिस्तानी कलाकार बॉलीवूड मध्ये येत होते त्यांना देशातून हाकलून लावलं, असे राज ठाकरे म्हणाले. तुमच्या अंगावर एक तरी आंदोलन केलेली केस आहे का? याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं, असा खरमरीत सवाल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला.

हे ही वाचा:

लेसबियन एलिमेंट: गरज, अपरिहार्यता की पब्लिसिटी स्ट्रॅटेजी?

… म्हणून इम्रान खान यांनी भारतावर उधळली स्तुतीसुमने

राज ठाकरेंच्या सभेला १३ अटी

लक्षद्वीपजवळ २१९ किलो हेरॉईन केले जप्त

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरूनही राज यांनी उद्धव यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, कोणत्याही मुद्द्यावर भूमिका घ्यायचीच नाही. भाषणात म्हणाले औरंगाबादचे नामांतर करायची काय गरज आहे. मी बोलतोय ना संभाजी नगर. त्यावर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना सवाल विचारले आहेत. तुम्ही कोण आहात? सरदार वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी ज्यांच्या बोलण्याने होईल. निवडणुकीसाठी हा मुद्दा जिवंत ठेवायचा म्हणून हे नामकरण केले जात नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,938चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
10,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा