महाराष्ट्रात हिंदी भाषेला तिसऱ्या ऐच्छिक भाषेच्या रूपात शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे शिक्षामंत्री दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निकालाशून्य ठरली असून, वादावर तोडगा निघालेला नाही.
राज ठाकरे हे हिंदी भाषा तिसऱ्या अनिवार्य भाषेच्या रूपात लागू करण्यास विरोध करत आहेत. याच मुद्यावर दादा भुसे गुरुवारी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटायला गेले. बैठकीनंतर दादा भुसे म्हणाले, “राज ठाकरे सरकारच्या निर्णयावर समाधानी नाहीत. त्यांनी काही शैक्षणिक बाबींवर सूचना केल्या आहेत, त्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या जातील. मात्र सध्या तरी कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.”
हे ही वाचा:
ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत-पाक युद्धात मीच केली मध्यस्थी!
भांडुपमध्ये तरुणीने केली आत्महत्या
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीत एका वीटभट्टी कामगाराने बिबट्याला लोळवले
व्हॉट्सऍप ग्रुुपमध्ये जोडला गेला, १ कोटी गमावून बसला!
राज्य सरकारने १ ली ते ५ वीपर्यंतच्या शाळांमध्ये हिंदी भाषेला तिसऱ्या ऐच्छिक भाषेच्या रूपात अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर मनसे आणि मराठी समर्थक संघटना आक्रमकपणे विरोध करत आहेत.
मनसेचा ६ जुलैला मुंबईत मोर्चा
राज ठाकरे यांनी ६ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये राज्य सरकारच्या भाषाविषयक धोरणाचा विरोध केला जाणार आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. त्यांनी इतर विरोधी पक्षांनाही एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. मराठी अभ्यास केंद्राच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
“शिक्षणमंत्री दादा भुसे येऊन गेले. त्यांनी त्यांची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला, जी मी संपूर्णपणे फेटाळून लावली. आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितलं. पाचवीनंतरच तिसऱ्या भाषेचा विषय येतो. त्यांनी हे मान्य केलं की, राष्ट्रीय शिक्षण धोरणात कोणत्याही गोष्टीचा समावेश नाही. राज्यांवर तो भार टाकण्यात आला आहे. राज्यावर भार टाकला तर हे का करत आहे, हे अजूनही अनाकलनीय आहे. सीबीएससी शाळा या नव्याने आल्या. त्या आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी काढलेल्या शाळा होत्या. त्या शाळांचे वर्चस्व राज्यातील शाळांवर करण्याचा प्रयत्न आहे. तोच केंद्र आणि आयएएस अधिकाऱ्यांचा अजेंडा आहे.
