राज्यातील मशिदींवरील अनधिकृत भोंग्याविरोधात भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या सतत आवाज उठवत आहेत. आतापर्यंत अनेक ठिकाणी भेट देवून अनधिकृत भोंग्याविरोधात आवाज उठवून त्यांनी भोंगे खाली उतरवले आहेत. ‘भोंगे मुक्त मुंबई, महाराष्ट्र’ या त्यांच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. मुंबईतल्या मशिदींवरील अनधिकृत भोंगे खाली उतरवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर आणि सुरू करण्यात आलेल्या मोहिमेनंतर ८०० हून अधिक मशिदीच्या ट्रस्टींनी स्पीकरसाठी परवानगी मागितली असल्याचे त्यांनी सांगितले.
किरीट सोमय्या ट्विटकरत म्हणाले, “मुंबईत मशिदी/मशिदींवर बेकायदेशीर लाउडस्पीकर नाहीत” मुंबई पोलिसांनी गेल्या ३ महिन्यांत मशिदींमधील १५०० हून अधिक बेकायदेशीर लाउडस्पीकर हटवले. मुंबई उच्च न्यायालयाने अशा स्पीकर, लाउडस्पीकर आणि ध्वनी प्रदूषणाबाबत निर्देश दिल्यानंतर आम्ही मोहीम सुरू केली.
९९ टक्के मशिदी/ट्रस्टींनी उच्च न्यायालयाच्या आदेशापर्यंत कधीही लाउडस्पीकरची परवानगी घेतली नाही किंवा त्यासाठी अर्जही केला नाही. घाटकोपर पश्चिम येथील ३३ मशिदी, मानखुर्द शिवाजी नगरमधील ७२ मशिदी, मुलुंडमधील ८ मशिदी आणि भांडुप येथील १९ मशिदी, ज्यांनी कधीही भोंगा-लाऊडस्पिकरसाठी पोलिसांची परवानगी घेतली नव्हती. इतक्या वर्षांपासून लाउडस्पीकरचा वापर इतक्या मोठ्याने होत होता. हजारो तक्रारी असूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
हे ही वाचा :
ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत-पाक युद्धात मीच केली मध्यस्थी!
आयआयटी पवईच्या कॅम्पसमध्ये बेकायदेशीर राहत होता तरुण, रेकी केल्याचा आरोप
व्हॉट्सऍप ग्रुुपमध्ये जोडला गेला, १ कोटी गमावून बसला!
दिलजीत दोसांझचा ‘सरदार जी ३’ पाकिस्तानात रिलीज होणार, भारतीय संतापले म्हणाले…
मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर आणि आमच्या अभियानानंतर पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आणि मशिदींवरील अनधिकृत भोंगे खाली उतरवण्यात आले. यानंतर आता ८०० हून अधिक मशिदीच्या ट्रस्टींनी परवानगी मागितली आहे. पोलिसांनी त्यांना १०”×१५” आकाराचे बॉक्स स्पीकर्सची परवानगी दिली आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
"भोंगे मुक्त मुंबई"
मुंबईतल्या एका ही मशिदीने एकही भोंग्याची, फेब्रुवारी 2025 पर्यंत, ह्यापूर्वी कधीही परवानगी घेतली नव्हती.
ह्यापूर्वी गेल्या अनेक वर्षात, एकही मशिदीने एकही भोंग्याची, लाऊडस्पिकर ची कधीही परवानगी मागितली नव्हती.
घाटकोपर पश्चिम येथे 33 मशीद पण ह्यापूर्वी एकही…
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 26, 2025
