भांडुप पश्चिम येथील महिंद्रा स्प्लेंडर सोसायटीमध्ये एका १९ वर्षीय तरुणीने इमारतीच्या ३० व ३१ व्या मजल्याच्या दरम्यान असलेल्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
मयत असलेल्या तरुणीची ओळख अस्मी (पूर्ण नाव गोपनीय) अशी असून, ती आणि तिचा मित्र आदित्य अरुण (वय १९, रा. फ्लॅट नं. ५०३, A विंग, महिंद्रा स्प्लेंडर सोसायटी) हे दोघेही शाळेपासूनचे मित्र होते. सध्या ते वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. अस्मी त्याला भेटण्यासाठीच इमारतीत आली होती.
हे ही वाचा:
जे काही घडलंय ते भारताच्या पथ्यावर पडणारे…
बारामतीत अजित पवारांचा ‘मतांचा कारखाना’, शरद पवारांचे पॅनल पराभवाच्या छायेत!
साकिब नाचन ब्रेन स्ट्रोकनंतर रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक
पाकिस्तानचा डोनाल्ड ट्रम्पना ठेंगा, इराण प्रकरणावर चीन-रशियासोबत एकजूट
दोघेही लिफ्टने ३२ व्या मजल्यावर गेले, त्यानंतर ३० आणि ३१ व्या मजल्याच्या दरम्यान असलेल्या खिडकीजवळ थांबले असता, अस्मीने आदित्यला सांगितले की, तिला अभ्यासामुळे नैराश्य येत आहे. आदित्यने तिला समजावून सांगितले आणि निघून गेला. मात्र, त्याच दरम्यान अस्मीने खिडकीतून उडी मारून आपले प्राण गमावले.
तिला तातडीने जवळच्या अग्रवाल जनरल रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. भांडुप पोलिस अधिक तपास करत असून, आत्महत्येमागील अचूक कारण जाणून घेण्यासाठी अधिक चौकशी केली जात आहे.
