बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने आघाडी घेतली आहे. निळकंठेश्वर पॅनलचे १३ उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे, या चुरीशीच्या लढाईत राष्ट्रवादी शरद पवारांच्या पॅनलला एकही जागा मिळाली नाहीये. शरद पवारांच्या बळीराजा सहकार पॅनलमधील सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे. या पॅनलचे नेतृत्व युगेंद्र पवार करत होते.
अजित पवारांच्या पॅनलचे १३ उमेदवार विजयी झाले असून २१ पैकी २० जागांवर आघाडी घेतल्याची बातमी समोर आली आहे. तर सहकार बचाव शेतकरी पॅनलचे चंद्रराव तावरे सांगवी गटातून विजयी झाले आहेत. त्यामुळे सहकार बचाव पॅनलला एकाच जागेवर समाधान मानावे लागणार असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे अजित पवारांच्या पॅनलने बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यानी गुलाल उधळत एकच जल्लोष केला आहे.
माळेगाव कारखान्याच्या यंदाच्या निवडणुकीत चौरंगी लढत होती. मात्र, अजित पवार, शरद पवार आणि चंद्रराव तावरे यांच्या पॅनलमध्ये चुरस होती. यासाठी मतदान पार पडले आणि मतमोजणी कालपासून सुरू झाली. लवकरच याचा अंतिम निकाल समोर येणार आहे.
हे ही वाचा :
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीत एका वीटभट्टी कामगाराने बिबट्याला लोळवले
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘या’साठी पंतप्रधान मोदींचे मानले आभार!
साकिब नाचन ब्रेन स्ट्रोकनंतर रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक
राष्ट्रीय जनता दलात हुकुमशाही, लालूंच्या निवडीनंतर उमटली प्रतिक्रिया
विशेष म्हणजे, या निवडणुकीत शरद पवार यांच्या पॅनलचा विजय होईल अशी चर्चा होती. मात्र, त्यांचा दारुण पराभव झाला. अजित पवार यांच्या बंडानंतर खरी राष्ट्रवादी आमचीच असे शरद पवार गटाकडून सांगण्यात येते होते. मात्र, कारखान्याच्या निकालाने सर्व चित्रच बदलून टाकले आहे. लोकसभा, राज्यसभा आणि आता या निवडणुकीत मिळालेलय विजयाने खरी राष्ट्रवादी कुणाची हे यावरून स्पष्ट होते.
