एरवी अनेक ठिकाणी बिबट्यांनी घातलेल्या हैदोसाची आणि माणसावर किंवा जनावरांवर हल्ला केल्याची उदाहरणे दिसतात. बिबटे आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष आता वाढत चालला आहे. मात्र उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे वेगळीच घटना पाहायला मिळाली. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी जिल्ह्यातील धौरहरा वन रेंजमधील जुगनूपूर गावात सोमवारी एक बिबट्याने अचानक हल्ला करत दहशत माजवली. वीटभट्टीवर काम करणाऱ्या मिहीलाल (३५) नावाच्या युवकावर या बिबट्याने हल्ला केला, पण युवक घाबरला नाही. त्याने जबरदस्त प्रतिकार केला.
बिबट्याच्या हल्ल्यावेळी ग्रामस्थानी दिली साथ
घटनेदरम्यान शेतात काम करणाऱ्या इतर ग्रामस्थांनी आवाज ऐकून धाव घेतली आणि दगडविटा फेकून बिबट्याला जखमी केले. त्यानंतर बिबटा पळून गेला. मिहीलाल मात्र बचावला. मिहीलाल आणि बिबटा दोघेही जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर बिबटा केळ्याच्या बागेत पळून गेला.
हे ही वाचा:
युकेचे प्राणघातक एफ-३५ जेट १० दिवसांपासून केरळमध्ये करतेय काय?
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘या’साठी पंतप्रधान मोदींचे मानले आभार!
पाकिस्तानचा डोनाल्ड ट्रम्पना ठेंगा, इराण प्रकरणावर चीन-रशियासोबत एकजूट
साकिब नाचन ब्रेन स्ट्रोकनंतर रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक
वन विभाग अधिकाऱ्यांवर हल्ला, बिबट्याला पकडले
घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी नृपेंद्र चतुर्वेदी आणि वनकर्मचारी राजेश कुमार दीक्षित घटनास्थळी पोहोचले. मात्र बिबट्याने वन विभागाच्या पथकावरही हल्ला चढवला, ज्यात पाच लोक जखमी झाले. त्यात दोन्ही अधिकारी, एक पोलिस कर्मचारी आणि एक स्थानिक रहिवासी (इकबाल खान) यांचा समावेश होता. जखमींना धौरहरा सीएचसी आणि नंतर लखीमपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. जखमींना तातडीने उपचार देण्यात आले. वन विभागाने तत्काळ ट्रँक्विलाइजरचा वापर करून बिबट्याला पकडले.
घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त
घटनेनंतर प्रभारी निरीक्षक सुरेश कुमार मिश्र आणि सीओ शमशेर बहादुर सिंह मोठ्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांनी शेत परिसर घेरून बिबट्याला अडवलं, त्यामुळे त्याला पकडण्यास मदत झाली.
वन विभागाचं स्पष्टीकरण
वन अधिकारी नृपेंद्र चतुर्वेदी म्हणाले, “या घटनेत बिबट्याने वन कर्मचाऱ्यांसह चार-पाच लोकांवर हल्ला केला आहे. सुदैवाने त्याला सुरक्षितरित्या गुंगीचे औषध देऊन करून पकडण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, ज्यात युवकाचा बिबट्याशी संघर्ष स्पष्टपणे दिसतो.
