27.5 C
Mumbai
Monday, July 14, 2025
घरराजकारणपवई, तुळशी तलावातील गाळ काढण्यासंदर्भात तीन महिन्यात कृती आराखडा सादर करा!

पवई, तुळशी तलावातील गाळ काढण्यासंदर्भात तीन महिन्यात कृती आराखडा सादर करा!

 मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांचे आदेश

Google News Follow

Related

पवई तलाव व तुळशी आणि विहार तलावातील गाळ काढण्यासंदर्भात येत्या तीन महिन्यात कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले.

पवई तलावातील गाळ काढण्यासंदर्भात आज मंत्रालयात  शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक अनिता पाटील यांच्यासह पर्यावरण विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा:

जे काही घडलंय ते भारताच्या पथ्यावर पडणारे…

साकिब नाचन ब्रेन स्ट्रोकनंतर रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक

युकेचे प्राणघातक एफ-३५ जेट १० दिवसांपासून केरळमध्ये करतेय काय? 

राष्ट्रीय जनता दलात हुकुमशाही, लालूंच्या निवडीनंतर उमटली प्रतिक्रिया

दर वर्षी जुलैमध्ये पवई तलाव भरून वाहत असतो. मात्र, यंदा जून महिन्यातच पवई तलाव भरून वाहू लागला आहे. त्यामुळे गाळ न काढल्यामुळे हा तलाव लवकर भरला का, तसेच तलावातील गाळ काढण्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनासंदर्भात यावेळी चर्चा झाली. पवई तलावातील प्रदुषणासंदर्भात मेरी या संस्थेने सर्वेक्षण केले आहे, असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पवई तलावचा परिसर हा ५५७ एकरावर आहे. या तलावात परिसरातील सांडपाणी सोडण्यात येत असल्यामुळे जलपर्णी वाढली आहे. हे सांडपाणी रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. पवई व तुळशीविहार तलावातील गाळ काढल्यानंतर त्याची वाहतूक व त्याची साठवणुकीसंदर्भात अभ्यास अहवाल तयार करून कृती आराखडा तयार करावा. गाळ काढण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत घेण्यात यावी, अशा सूचना शेलार यांनी यावेळी दिल्या.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा