31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारणधक्कादायक......!! कालव्यात सापडली शेकडो रेमडेसिवीर इंजेक्शने!!

धक्कादायक……!! कालव्यात सापडली शेकडो रेमडेसिवीर इंजेक्शने!!

Google News Follow

Related

देशात एकीकडे कोरोनाचा कहर वाढत आहे. रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर या जीवनोपयोगी औषधाची कमतरता जाणवत आहे. अशा वेळेस पंजाबमध्ये भाकरा कालव्यात अनेक रेमडेसिवीरची इंजेक्शने सापडली आहेत.

पंजाबच्या चमकौर साहिब जवळच्या भाकरा कालव्यात शेकडो रेमडेसिवीर आणि छातीच्या संसर्गावरील इंजेक्शने सापडली आहेत. यात सरकारी कामासाठी वापरली जाणारी १४५६ इंजेक्शने, ६२१ रेमडेसिवीर आणि ८४९ कोणतंही नाव नसलेली इंजेक्शने सापडली आहेत. ही इंजेक्शने सत्य आहेत अथवा नकली याबाबत मात्र नेमकी माहिती मिळू शकलेली नाही, असे वृत्त न्युज १८ (हिंदी) या वार्तासंकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे.

हे ही वाचा:

जाणत्या-अजाणत्यांचे बार बार देखो

कोविड पाठोपाठ बळावतोय आणखी एका आजाराचा धोका

सरकारची वृत्ती ‘गरज सरो वैद्य मरो’ अशीच

कोविड रुग्णांना भारतीय बनावटीच्या ‘वायुपुत्रा’ची साथ

या बातमीत त्यांनी एका स्थानिक दैनिकाचा हवाला दिला आहे. या इंजेक्शनवर किंमत ५४०० रुपये छापली आहे, तर या इंजेक्शनची उत्पादन दिनांक मार्च २०२१ आहे आणि समाप्ती दिनांक नोव्हेंबर २०२१ आहे. या इंजेक्शनवर सरकारी पुरवठ्यासाठी इतकेच लिहीले आहे. त्यातून कोणते सरकार? याचा खुलासा होऊ शकलेला नाही. याबाबत स्थानिक पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.

देशात रेमडेसिवीरचा तुटवडा असताना अशा प्रकारची घटना धक्कादायक आहे. या काँग्रेसशासित पंजाब मधल्या या घटनेवरून अतुल भातखळकरांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटर म्हटले आहे की,

काँग्रेस शासित पंजाबमध्ये सरकारी कोट्यातील हजारो रेमडेसिविर इंजेक्शन्स कालव्यात सापडली आहेत. आपल्या जनतेचे जीव गेले तरी चालतील पण केंद्र सरकारला बदनाम झाले पाहिजे यासाठी विरोधक किती हीन पातळीवर उतरू शकतात त्याचे हे उदाहरण आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा