26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरक्राईमनामानुपूर शर्मांचे शीर कापणाऱ्यास घर देण्याची भाषा; अजमेर शरीफच्या सलमानला अद्याप अटक...

नुपूर शर्मांचे शीर कापणाऱ्यास घर देण्याची भाषा; अजमेर शरीफच्या सलमानला अद्याप अटक नाही

Related

नुपूर शर्मा यांचे शीर कापून आणणाऱ्यास घर देण्याची भाषा करणारा सलमान चिश्ती याला अद्याप राजस्थानातील अजमेर पोलिस अटक करू शकलेली नाही. अजमेर शरीफ दरगाहचा खादिम असलेला सलमान चिश्ती याने व्हिडिओ करत नुपूर शर्मा यांना गोळी मारण्याची धमकी दिली होती तसेच जो कुणी नुपूर शर्मा यांचे शीर कापून आणून देईल त्याला घर बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा केली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, पण अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी तर सदर सलमान चिश्ती हा इसम नशेत असल्याचे कारण पुढे केले आहे. अर्थात, त्याने दिलेली ही धमकी ही नशेच्या अधीन होऊन दिलेली आहे, असे म्हणत या घटनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न पोलिसांना चालवला आहे, असा आरोप केला जात आहे. या सलमानचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

महत्त्वाचे म्हणजे सलमान चिश्ती हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती असून हे प्रकरण अंगाशी येणार हे लक्षात आल्यावर त्याने घरीच फोन सोडत तो फरार झाला. पण त्याच्या शोधासाठी पोलिस धावपळ करत आहेत. पण अद्याप त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

हे ही वाचा:

शिवसेनेत किती संतोष बांगर उरलेत???

उद्धवजी, मुर्मूना पाठिंबा द्या! खासदार राहुल शेवाळे यांचा लेटरबॉम्ब

उद्धव ठाकरे यांचे टोमणेबॉम्ब सुरूच!

वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची हत्या

 

नुपूर शर्मा यांना भाजपाच्या प्रवक्त्या असताना एका चॅनलवरील चर्चेदरम्यान मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वक्तव्य केले होते. पण त्यानंतर देशभरात गदारोळ निर्माण झाला. नुपूर शर्मा यांना अटक करा अशी मागणी होऊ लागली. त्यातील इस्लामी कट्टरतावाद्यांनी नुपूर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याचे फतवे काढले. न्यायालयानेही त्यात केलेल्या वक्तव्यांनी

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा