कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी सोमवारी सांगितले की, जेव्हा ते परदेशात भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याच्या समर्थनासाठी दौऱ्यावर आहेत, तेव्हा देशात काही लोक केवळ राजकीय निष्ठांचे हिशेब मांडत आहेत, ही बाब “खिन्न करणारी” आहे. देशभक्त होणे इतके कठीण असते का?
त्यांच्या या वक्तव्याची पार्श्वभूमी म्हणजे त्यांनी अलीकडेच कलम ३७० हटवण्याचे समर्थन केले होते. त्यावरून काँग्रेसमध्ये नाराजी होती. यामुळे भाजपने त्यांच्या पक्षावर टीका केली होती.
“देशासाठी एकत्र बोलणे गरजेचे आहे”
“दहशतवादाविरुद्ध लढताना, जेव्हा आपण भारताचा संदेश जगाला पोहोचवण्यासाठी मिशनवर आहोत, तेव्हा देशात काही लोक राजकीय भूमिका घेत बसले आहेत, हे दु:खद आहे. इतकं कठीण आहे का देशभक्त होणं?” असे ट्विट त्यांनी क्वालालंपूर दौऱ्यात केले.
ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, लोक विचारतात, ‘तुम्ही अशा प्रतिनिधीमंडळात काय करताय जिथे भाजपचे लोक आहेत?’ आम्ही इथे देशासाठी आवश्यक आहे त्यावर बोलत आहोत. कोणत्याही पक्षाचे असाल, तरी आज देशासाठी एकच आवाज गरजेचा आहे.
“कलम ३७० हटवणं योग्य होतं”
जकार्तामध्ये, विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञांशी बोलताना खुर्शीद म्हणाले, काश्मीरमध्ये दीर्घकाळ गंभीर समस्या होत्या. त्या समस्यांचा प्रभाव घटनात्मक कलम ३७० मध्ये दिसून येत होता, ज्यामुळे काश्मीर देशापासून वेगळा वाटतो होता. हे कलम अखेर हटवण्यात आले. त्यानंतर निवडणुका झाल्या आणि ६५% मतदान झाले. आज काश्मीरमध्ये निवडून आलेले सरकार आहे. त्यामुळे जो कोणी आज हे सर्व मागे नेण्याचा विचार करतो, तो काश्मीरच्या प्रगतीला धक्का देतो आहे, जे वाईट आहे.”
हे ही वाचा:
राणी बागेत जन्मलेल्या पेंग्विन्सच्या पिल्लांची नावे मराठीत हवी!
बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी थांबवा, विहिंपची मागणी!
१६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, ‘हे’ गाव झाले नक्षलमुक्त!
मनीषा कोइरालाने मणिरत्नमला दिल्या शुभेच्छा
हे प्रतिनिधीमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया, जपान आणि सिंगापूर यांना भेट देऊन भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
खुर्शीद यांच्या वक्तव्यांनंतर काँग्रेसने अधिकृतपणे काही प्रतिक्रिया दिली नाही, परंतु भाजपने जोरदार टीका केली.
पुरीचे भाजप खासदार संबित पात्रा म्हणाले, कोणी तरी राहुल गांधींना हे सांगायला हवं की, आता त्यांचेच नेते सलमान खुर्शीद यांनी ३७० च्या हटवण्याचं समर्थन केलंय.”
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी उपरोधिक टोला लगावत म्हटलं, आता काँग्रेस सलमान खुर्शीद यांना ‘सुपर प्रवक्ता’ घोषित करणार का? हे वक्तव्य शशी थरूर यांच्यावर काँग्रेस प्रवक्ते उदित राज यांनी केलेल्या पूर्वीच्या वक्तव्याच्या संदर्भात होते.
