28.5 C
Mumbai
Saturday, August 8, 2026
घरराजकारणतामिळनाडूचे मुख्यमंत्री विजयला मोठा दिलासा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजयला मोठा दिलासा

पत्नी संगीता यांनी घटस्फोटाचा अर्ज घेतला मागे

Google News Follow

Related

तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय यांच्या वैवाहिक आयुष्यात सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. विजय यांच्या पत्नी संगीता यांनी चेंगलपट्टू येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज अधिकृतपणे मागे घेतला असून न्यायालयानेही हे प्रकरण निकाली काढले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाचा शेवट झाला आहे.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये संगीता यांनी विजय यांच्याविरोधात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाची राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी चर्चा रंगली होती. त्यानंतर अनेक वेळा सुनावण्या पार पडल्या, मात्र जून महिन्यातील सुनावणीदरम्यान त्यांनी अर्ज मागे घेण्याची इच्छा न्यायालयासमोर व्यक्त केली होती. अखेर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजेरी लावत घटस्फोटाची प्रक्रिया पुढे न नेण्याचा निर्णय जाहीर केला.
हे ही वाचा:
भारताकडे येणाऱ्या ६२ जहाजांनी सुरक्षितपणे ओलांडली होर्मुझ

झारखंड आंदोलनात गेलेल्या नेहा बोराला मंचावरून उतरवले, शाई फेकली

भारत-चीन सीमावादावर चर्चा; सीमावर्ती भागात शांतता राखण्यावर भर

गणेशोत्सवानिमित्त पश्चिम रेल्वेची प्रवाशांसाठी मोठी भेट

संगीता यांच्या विनंतीची दखल घेत न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली आणि प्रकरण निकाली काढले. त्यामुळे या प्रकरणातील सर्व न्यायालयीन प्रक्रिया अधिकृतपणे समाप्त झाली आहे. दरम्यान, संगीता यांनी अर्ज मागे घेण्यामागील कारणांबाबत कोणतीही सार्वजनिक माहिती दिलेली नाही. तसेच विजय आणि संगीता यांच्यात समेट झाला आहे का, याबाबतही दोन्ही बाजूंनी कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. मात्र, घटस्फोटाचा अर्ज मागे घेतल्याने विजय यांच्या वैवाहिक आयुष्याभोवती निर्माण झालेल्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
326,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा