29 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर राजकारण चंद्रपूरनंतर 'या' जिल्ह्यातील दारूबंदी उठवणार

चंद्रपूरनंतर ‘या’ जिल्ह्यातील दारूबंदी उठवणार

Related

ठाकरे सरकार आता चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवल्यानंतर आणखी एका जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याचा विचार करत आहे. चंद्रपूरची दारुबंदी सफलतेने उठवल्यानंतर आता गडचिरोलीचीही दारुबंदी उठवण्याचे संकेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. चंद्रपूरची दारुबंदी उठल्यामुळे लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पण तिथं पालकमंत्री वेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलून पुढील कार्यवाही केली जाईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

तर गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील लोकांच्या भावना जाणून घेऊन निर्णय घ्यावा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तर वडेट्टीवार यांनी दारुबंदीला विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर टीकेची तोफ डागली.

दारुबंदीला विरोध करणारे जिल्ह्यातील समाजसेवक बेगडी आहेत. या जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये त्यांचे काहीही योगदान नाही, जनता त्यांच्या पाठीशी नाही. तेच लोक आपली भूमिका मांडत असतात, अशी तिखट टीकाही त्यांनी केली. चंद्रपूरप्रमाणेच गडचिरोलीतही दारूबंदीचा आढावा घेणारी एखादी समिती पालकमंत्र्यांनी स्थापन केली, तर त्यात कौल समोर येऊ शकतो. त्यादृष्टीने त्यांच्याशी चर्चा करू, असे सांगत वडेट्टीवार यांनी गडचिरोलीच्या दारुबंदीला उठवण्याची एकप्रकारे तयारीच केल्याचे दिसून येते.

ठाकरे सरकारने हा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह चंद्रपूरमधील शेकडो गावांतील लो दारुबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत होते. मात्र, दारुबंदी असूनही चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विकली जात होती.

हे ही वाचा:

गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव

हॉस्पिटलचा धंदा चालावा म्हणून लस खरेदी केली नाही?

ट्विटरचा आडमुठेपणा कायम

१०० कोटींची वसूली आता ३०० कोटींची?

दारूबंदी उठवावी अडीच हजार निवेदने दिली होती. अवैद्य आणि डुप्लिकेट दारू जिल्ह्यात विकली जात होती. त्यामुळं दारूबंदीचे दुष्परिणाम दिसू लागले होते. यासंदर्भात एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने दारूबंदी उठवावी यासंदर्भात अहवाल दिला होता. हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला होता. हा अहवाल मंजूर करत ठाकरे सरकारने चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेतला होता.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा