26 C
Mumbai
Tuesday, October 4, 2022
घरराजकारणरावत यांचा राजीनामा राज्यपालांकडे सादर

रावत यांचा राजीनामा राज्यपालांकडे सादर

Related

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी राज्यपाल बेबी रानी मौर्य यांच्याकडे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केला आहे. राज्यात संविधानात पेचप्रसंग उद्भवू नये यासाठी तिरथ सिंह रावत यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणून संधी दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आहेत.

शुक्रवार, २ जुलै रोजी रात्री ११ वाजल्याचा सुमारास तिरथ सिंह रावत यांनी राजभवन येथे जाऊन आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्त केला. त्याच्या जवळपास एक तास आधी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सरकारने केलेल्या कामाची माहिती दिली. पण त्यावेळी पत्रकारांनी राजीनाम्याबद्दल विचारले असता त्यावर रावत यांनी उत्तर देण्याचे टाळले.

राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्त केल्यानंतर रावत यांनी पुन्हा पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यावेळी बोलताना रावत यांनी राज्यात संविधानिक पेच तयार होऊ नये यासाठी आपण राजीनामा दिल्याचे सांगितले. यासाठी त्यांनी संविधानाच्या कलम १५१ आणि कलम १६४ चा हवाला दिला. तर आपल्याला मुख्यमंत्री म्हणून संधी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले.

या पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाचे उत्तराखंड प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांनी सांगितले की पक्ष नेतृत्वाच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी आपला राजीनामा दिला आहे. तर राज्याचा पुढचा मुख्यमंत्री हा एखाद आमदारच असणार असे त्यांनी स्पष्ट केले. शनिवारी होऊ घातलेल्या भाजपाच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत याचा निर्णय होणार असल्याची माहिती मदन कौशिक यांनी दिली.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,946अनुयायीअनुकरण करा
42,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा