34 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणउद्धव ठाकरे युतीसाठी तयार होते, पण...

उद्धव ठाकरे युतीसाठी तयार होते, पण…

Google News Follow

Related

खासदार राहुल शेवाळेंच्या वक्तव्यांने नव्याने चर्चा

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अनेक विषय उघड केले.

शिवसेनेतल्या १२ खासदारांनी मंगळवारी एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा शेवाळे म्हणाले की, आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यावर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बैठकीला बोलावले.  तेव्हा पक्षासोबत राहू असे आम्ही त्यांना सांगितले. २०१९ची निवडणूक एनडीए माध्यमातू लढविली आहे. दोन वर्षे त्रास होतो आहे. तेव्हा उद्धवरावांनी भूमिका मान्य केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर मी भूमिका स्वीकारेन, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर मी स्वागत करेन, असेही त्यांनी सांगितले होते.

शेवाळे म्हणाले की, मग दुसरी बैठक झाली. चार पाच बैठका झाल्या. सर्व खासदारांना २०२०४ची निवडणूक लढवायची तर युती करावी लागेल असा आग्रह धरला. तेव्हा उद्धवजी म्हणत होते की, आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवूया. आम्ही अरविंद सावंत यांना या अडचणी सांगितल्या. पण तिथून प्रतिसाद मिळाला नाही.

एनडीए सोबत जायचे असेल तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला हवा, असे आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितले, असे शेवाळे यावेळी म्हणाले. त्यावेळी उद्धव यांनी सांगितले की, युती करायची आहे. आपण प्रयत्न केला. मोदींना भेटायला गेलो तेव्हा मोदींकडे उल्लेख केला. एक तास चर्चा झाली. शेवाळे म्हणाले की, पण जुलैला अधिवेशन होते. त्यावेळी अधिवेशनात भाजपाच्या १२ आमदारांवर कारवाई केली. त्यामुळे भाजपा नेतृत्व नाराज झाले. युतीची चर्चा करताना ही कारवाई का, असा सवाल उपस्थित केला गेला. कित्येकवेळा युतीची चर्चा केली, भाजपाला मात्र शिवसेनेकडून सहकार्य मिळाले नाही. चार पाच खासदारांसह शिंदे फडणवीसांना भेटलो. पण पूर्तता न केल्यामुळे भाजपा पक्षश्रेष्ठी नाराज होते. हे चालत असताना संजय राऊत यांच्या माध्यमातून मविआ यांच्यासोबत बैठका सुरू होत्या. त्यामुळे खासदारांमध्ये नाराजी झाली.

हे ही वाचा:

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकाच्या मुसक्या आवळल्या

लोकसभा अध्यक्ष संतापले; ही सदस्यांची दुटप्पी वृत्ती

स्विमिंग पूलमध्ये पडून लहानग्याचा मृत्यू; धक्कादायक व्हीडिओ व्हायरल

महाराष्ट्राच्या ‘त्या’ सुपुत्राने केला लेह ते मनाली पायी प्रवास

 

वेळोवेळी आम्ही एनडीए, युतीसाठी विनंती केली पण जो सकारात्मक प्रतिसाद हवा तो मिळाला नाही. मविआचा कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न झाला. अरविंद सावंत हे एनडीएच्या कॅबिनेटमधून बाहेर पडले पण अद्याप शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडल्याचे कोणतेही पत्र दिलेले नाही. त्यामुळे अजूनही आम्ही एनडीएसोबत आहोत, असेही शेवाळे म्हणाले.

यावर अरविंद सावंत, खासदार संजय राऊत यांनी मात्र विरोधी मत व्यक्त केले. आम्ही एनडीएसोबत नाही. आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले म्हणजे आम्ही एनडीएसोबत नव्हतो हे स्पष्ट होते, असे राऊत आणि सावंत म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा