25 C
Mumbai
Monday, January 17, 2022
घरराजकारणयोगी आदित्यनाथ अयोध्येतून लढविणार निवडणूक?

योगी आदित्यनाथ अयोध्येतून लढविणार निवडणूक?

Related

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्येतून आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे संकेत मिळत आहेत. फेब्रुवारी मार्च या कालावधीत उत्तर प्रदेशातील बहुचर्चित निवडणूक होत आहे. भाजपाच्या राज्य निवडणूक समितीची बैठक झाल्यानंतर त्यातून हे संकेत मिळू लागले आहेत.

उत्तर प्रदेश निवडणुकीत अयोध्येचे महत्त्व लक्षात घेता योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढविणार असल्यास त्याला तेवढेच महत्त्व प्राप्त होते.

भाजपाच्या एका नेत्याने म्हटले आहे की,  देशातील हिंदूंची एकजूट होण्यासाठी राम मंदिर हा एकमेव मुद्दा आहे. त्यामुळे अयोध्येसारख्या अत्यंत संवेदनशील अशा ठिकाणाहून योगी आदित्यनाथ यांच्याव्यतिरिक्त आणखी कोण निवडणूक लढवू शकतो. राम जन्मभूमी चळवळीशी आदित्यनाथ यांची असलेली नाळ लक्षात घेता त्यांनी तिथून निवडणूक लढवावी अशी अनेकांची इच्छा आहे.

२०१७मध्ये अयोध्येतून वेदप्रकाश गुप्ता यांनी तिथून निवडणूक लढविली होती आणि जिंकली होती. अयोध्येत यावेळी २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

भाजपाचे राज्यसभा खासदार हरनाथ सिंह यादव यांनी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून योगी यांना मथुरा येथून निवडणूक लढविण्यास सांगावी असे म्हटले होते.

हे ही वाचा:

धक्कादायक!! श्रीलंकेत १०० ग्रॅम मिरची १०० रुपयांना

अवकाश यानात शिरला गोरिला आणि…

सराव न करताच खेळा मिनी ऑलिम्पिक!

‘मुख्यमंत्रीजी, आम्ही आमच्या आरोग्याची काळजी घेतो, तुम्ही शाळा सुरू करा’

 

योगी आदित्यनाथ हे मथुरा, अयोध्या की गोरखपूर यापैकी कोणत्या ठिकाणाहून निवडणूक लढविणार याविषयी मतमतांतरे पुढे येत आहेत. पण त्यामुळे समाजवादी पार्टी, काँग्रेस, बसप यांच्यात संभ्रमाचे वातावरण आहे की योगी आदित्यनाथ कुठून निवडणूक लढविणार त्यानुसार त्यांना डावपेच आखावे लागणार आहेत.

योगी आदित्यनाथ यांनी आपण निवडणूक लढविणार आहोत आणि पक्ष आपण कुठून निवडणूक लढवू हे जाहीर करेल, असे म्हटले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,582अनुयायीअनुकरण करा
5,710सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा