25 C
Mumbai
Monday, January 17, 2022
घरदेश दुनियाब्रिटनमध्ये सापडले 'समुद्री ड्रॅगन'चे अंश

ब्रिटनमध्ये सापडले ‘समुद्री ड्रॅगन’चे अंश

Related

‘समुद्री ड्रॅगन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या इचथियोसॉरचे १८० दशलक्ष वर्षे जुने जीवाश्म अवशेष ब्रिटनमधील संशोधकांना सापडले आहेत.

संशोधकांनी त्याचे वर्णन या प्रदेशातील सर्वात महत्त्वपूर्ण शोधांपैकी एक म्हणून केले आहे. कारण हा जीवाश्म यूकेमध्ये सापडलेला त्याच्या प्रकारातला सर्वात मोठा आणि संपूर्ण सांगाडा आहे.

इचथियोसॉर शरीराच्या आकारात डॉल्फिनसारखे होते आणि सुमारे ९० दशलक्ष वर्षांपूर्वी नामशेष झाले आहेत. रुटलँड काउंटीमधील जलाशयात सापडलेला हा सांगाडा सुमारे दहा मीटर लांबीचा आहे. जो डेव्हिस हे लीसेस्टरशायर आणि रटलँड वाइल्डलाइफ ट्रस्टचे एक संवर्धन टीम लीडर आहेत. त्यांना प्रथम चिखलात कशेरुकाचे काही भाग दिसले. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आले.

डेव्हिस म्हणले, हा प्राणी कसा समुद्रात पोहला असेल याची कल्पनाही करणे अशक्य आहे. याचा हा पूर्णपणे एकत्रितपणे आकार असणे हे खरोखरच अपवादात्मक आहे. यूकेमधील हा सर्वात प्रभावशाली सागरी जीवाश्म शोधांपैकी एक आहे.
पहिले इचथियोसॉर, ज्यांना समुद्री ड्रॅगन म्हणतात कारण त्यांना खूप मोठे दात आणि डोळे असतात. याचा शोध जीवाश्म संशोधक आणि जीवाश्मशास्त्रज्ञ मेरी ऑनिंग यांनी १९ व्या शतकाच्या सुरुवातीला लावला.

हे ही वाचा:

बीडची लेडी सिंघम ठरली ‘मिस महाराष्ट्र’

…आणि काडीपेटीची झाली साडीपेटी!

अभिनेता सिद्धार्थने सायनापुढे मान्य केला पराभव

अब आया है उंट हॉटेल के अंदर!

 

ब्रिटीश अंटार्क्टिक सर्व्हेचे मार्क इव्हान्स, हे वीस वर्षांहून अधिक काळ जुरासिक जीवाश्म सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९७० च्या दशकात रटलँड वॉटरच्या बांधकामादरम्यान दोन अपूर्ण आणि बरेच लहान इचथिओसॉर सापडले होते. मात्र या अर्धवट उघड झालेल्या जीवाश्माच्या पहिल्या झलकवरूनही हे स्पष्ट होत होते की हा आतपर्यंत सापडलेला सर्वात मोठा इचथियोसॉर आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,582अनुयायीअनुकरण करा
5,710सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा