32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारणशिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आज काय होणार?

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आज काय होणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे लक्ष

Google News Follow

Related

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर पहिल्यांदाच कार्यकारिणीची बैठक होत आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाची सुनावणी चालू आहे. एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने पक्षाचे चिन्ह आणि नाव दिले असून ,त्यावर  आता उद्धव ठाकरे यांनी न्यायालयांत धाव घेतली आहे. तर मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कार्यकारिणीची बैठक होत असून याला आमदार, खासदार आणि सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. मुंबईत नामांकित हॉटेल मध्ये होणाऱ्या या बैठकीत अनेक महत्वपूर्ण घोषणा होणार आहेत.

शिंदे गटाच्या वतीने शाखांबरोबरच पक्षही मजबूत करण्यासाठी भर देणार असल्याचे बोलले जाते , तर अनेक महत्वपूर्ण घोषणा करणार असल्याचे बोलले जाते.  यात प्रामुख्याने संजय राऊत यांचे मुख्य नेतेपद ही काढून घेतले जाणार असे बोलले जाते. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. ज्या पक्ष प्रमुख या पदावरूनच उद्धव ठाकरे आज अडचणीत आले, ते शिवसेना पक्षप्रमुखपद एकनाथ शिंदे स्वीकारणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदेच्या बाजूने निकाल दिल्यावर आता शिवसेनेची मालमत्ता आणि फंडस् कोणाकडे जाणार याविषयी भूमिका आजच्या कार्यकारिणी बैठकीत चर्चा होऊन ठरणार आहे. याशिवाय पक्षातील नेत्यांवर विविध जबाबदाऱ्या देण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय मार्गदर्शनपर बोलणे  करणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे.

कोणकोणते निर्णय घेतले जाणार

ठाकरेंसोबत असलेल्या आमदारांना व्हीप बजावण्यासाठी पत्र देण्यात येणार
मुख्य नेते पदी एकनाथ शिंदे यांची निवड होणार
आता एबी फॉर्मवर साह्य कोणाच्या असतील ते ठरणार
शिव सेना घराघरांत पोहोचवणार
आजच्या बैठकीत महत्वाचे नेते सचिव ठरवणार

हे ही वाचा:

लढाई शिवसेना भवन बळकावण्यासाठी नव्हती

शिवसेनेचे विधीमंडळातील कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात..शिवालयही येणार

बागेश्वर धाममध्ये इतकी लोक आले पुन्हा हिंदू धर्मात

रुग्ण म्हणून दाखल झाला आणि रुग्णालयातून चोरले महागडे नळ…

४० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे शिवसेना पक्षातून बाहेर पडले त्यानंतर, त्यांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगात हि लढाई चालू होती. शुक्रवारी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला आणि उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले. त्यामुळे आता शिवसेना एकनाथ शिंदे यांची असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे.

 

 

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा