23 C
Mumbai
Tuesday, March 21, 2023
घरराजकारणशिवसेनेचे विधीमंडळातील कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात..शिवालयही येणार

शिवसेनेचे विधीमंडळातील कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात..शिवालयही येणार

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घेतली भेट

Google News Follow

Related

शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह अधिकृतपणे शिंदे गटाकडे आले आहे. त्यानंतर आता शिंदे गटाकडून विविध हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबईतील विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी सकाळीच विधीमंडळ कार्यालय गाठले. शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. आमदारांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर  शिवसेना पक्षाचे विधिमंडळातील कार्यालय आपल्या ताब्यात घेतले. दुपारी शिवालय देखील ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्यामुळे विधीमंडळातील शिवसेनेचे कार्यालय आम्हाला मिळावे, अशी मागणी शिंदे गटाकडून यावेळी करण्यात आली. या मागणीतून शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळातील कार्यालयावर आपला हक्क सांगितला. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्यावेळी नागपूर येथील विधीमंडळाच्या आवारातील शिवसेना कार्यालय दोन्ही गटांना विभागून देण्यात आले होते.

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यानी हळूलू टप्प्याटप्याने पूर्वाश्रमीच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी निगडित शाखा , कार्यालये अधिकृतपणे ताब्यात घेण्याची तायतयरी सुरु केली आहे. त्यानुसार आता प्रत्येक जिल्ह्यातील कार्यालय, विधीमंडळ पक्षाचे कार्यालय, लोकसभेत असलेले कार्यालय या सर्वांवर शिंदे गट आता दावा करणार आहे. विधिमंडळातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावर केलेला दावा हे त्याचे पहिले पाऊल आहे. त्यानुसार शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले  यांच्या नेतृत्वाखाली आमदारांची बैठक झाली. या बैठकीत विधिमंडळ कार्यालयावर दावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेण्यात आली.

हे ही वाचा:

बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीत जो येईल तो नवी ऊर्जा, प्रेरणा घेऊन जाईल!

११व्या मुलाच्या जन्मानंतर त्याने पत्नीला घराबाहेर काढले…

रुग्ण म्हणून दाखल झाला आणि रुग्णालयातून चोरले महागडे नळ…

मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाय चाटले

शिसेना पक्षनाव आणि चिन्ह देण्याचा योग्य निर्णय झाला आहे. विधिमंडळ कार्यालय ताब्यात घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना रीतसर पत्र पाठवण्यात आले होते. महापालिकेतील कार्यालये, शाखा ताब्यात घेण्याच्या संदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. विधिमंडळातील कार्यालय हे त्यादृष्टीने पहिले पाऊल असल्याचे आमदार भारत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले.

शिवालय देखील घेणार ताब्यात
विधी मंडळातील शिवसेनेच्या कार्यालयांतर आता शिवालय हे शिवसेनेचे शासकीय कार्यालयही ताब्यात घेण्यात येणार आहे. शिंदे गट दुपारी शिवालयाकडे कूच करणार आहेत. त्याच बरोबर नागपूर, पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालये तसेच शिवसेनेची तालुका, जिल्हा पातळीवरीळ कार्यालये देखील ताब्यात घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,884चाहतेआवड दर्शवा
2,019अनुयायीअनुकरण करा
65,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा