30 C
Mumbai
Tuesday, March 28, 2023
घरराजकारणठाकरे गटातील कोणत्या नेत्यांचे श्रीलंका, सिंगापूर आणि लंडनमध्ये हॉटेल्स

ठाकरे गटातील कोणत्या नेत्यांचे श्रीलंका, सिंगापूर आणि लंडनमध्ये हॉटेल्स

 खेडच्या सभेत रामदास कदमांचा सवाल

Google News Follow

Related

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कदमांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. कदम परिवाराला राजकिया दृष्ट्या संपवण्यासाठी कसे प्रयत्न केले गेले याबद्दल अनेक खुलासे करत त्यांनी श्रीलंका , सिंगापूर आणि लंडन येथे कोणाची हॉटेल्स आहेत याचा त्यांनी उल्लेख करत ठाकरे गटावर निशाणा साधला.

माझा मुलगा योगेश कदम याला कसे संपवायचे याचे ठाकरे गटाकडून षडयंत्रे रचली होती उदय सामंत सुद्धा तेव्हा त्या गटात होते. पण कटात नव्हते. या सगळ्यांत बदमाश सुभाष देसाई सगळ्यात पुढे होता. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे रामदास कदम सारख्या वाघाला सांभाळायचे तेव्हा तुम्ही सुभाष देसाई सारख्या शेळ्या मेंढ्याना सांभाळता हा तुमच्यातला फरक आहे. अशी जोरदार टीका त्यांनी या सभेत केली.

हे ही वाचा:

भास्कर जाधवांना राष्ट्रवादीचे वेध लागलेत का?

5G नंतर आता 6G ची तयारी, भारताने घेतले १००पेटंट

‘मिलेट्सचे’ यश ही भारताची जबाबदारी

कांदिवलीत महारोजगार मेळाव्याने दिल्या नोकऱ्या आणि घसघशीत पगार

पुढे कदम म्हणाले कि, आज तुम्ही जो खोक्यांवर आरोप लावता त्याच रामदास कदमने कोकणामध्ये खोकेच्या खोके वाटून तुमची उंची वाढवली होती. तुम्हाला आता लाज वाटत नाही का? आमच्याकडे बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. कुणाचे हॉटेल श्रीलंकेला तर कोणाचे लंडनला आहे तर कोणाची मालमत्ता अमेरिकेत आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळल्याशिवाय राहणार नाही खोक्यांची भाषा तुमच्या तोंडात शोभते का? असा सवाल कदमांनी यावेळेस केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा