33 C
Mumbai
Monday, May 29, 2023
घरराजकारणएफआयआर दाखल झाले; सर्वोच्च न्यायालयातील कुस्तीगीरांचे प्रकरण संपले

एफआयआर दाखल झाले; सर्वोच्च न्यायालयातील कुस्तीगीरांचे प्रकरण संपले

आता खालच्या न्यायालयात आवश्यकता भासल्यास जाण्याच्या सूचना

Google News Follow

Related

कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर एफआयआर दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणाऱ्या कुस्तीगीरांना आता खालच्या न्यायालयात पुढील कारवाईसाठी जाण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालयात बृजभूषण यांच्याविरोधातील तक्रारींबाबत याचिका दाखल करावी लागणार आहे.

दिल्ली पोलिसांनी खेळाडूंच्या अपेक्षेप्रमाणे एफआयआर दाखल केले नव्हते त्यामुळे खेळाडूंनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंहा आणि जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठाने सांगितले की, एफआयआर दाखल करावा या मागणीसाठी खेळाडू सर्वोच्च न्यायालयात आलेले आहेत. त्यानुसार आत बृजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाले आहेत. त्यामुळे खेळाडूंची जी अपेक्षा होती ती आता पूर्ण झाली आहे. चौकशी केली जावी यासंदर्भातच आमची भूमिका मर्यादित होती.

दिल्ली पोलिसांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. ही चौकशी पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक असेल. प्रत्येक वेळेला याचिकादारांनी सर्वोच्च न्यायालयात येण्याची आवश्यकता नाही. त्यातून न्याय मिळणे शक्य नाही.

खंडपीठाने खेळाडूंच्या वकिलांना सांगितले की, खेळाडूंच्या जर काही तक्रारी असतील तर त्यांनी दंडाधिकाऱ्यांकडे किंवा दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागावी. बृजभूषण यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणारे वकील हरिश साळवे म्हणाले की, बृजभूषण सिंह यांच्याविरोधातले आरोप हे वैयक्तिक स्वरूपाचे आहेत. त्यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बृजभूषण हे तक्रारदार खेळाडूंची ओळख उघड करत आहेत, या खेळाडूंच्या वकिलांच्या आरोपावर तुषार मेहता म्हणाले की, तक्रारदार हेच मुळात आपली ओळख लपवत नाहीएत. ते धरणे आंदोलनाला बसले आहेत. त्यांचे पालक हे वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत आहेत.

हे ही वाचा:

पवारांनी सांगितले आणखी १-२ दिवस थांबा!

मुंबईतील बिबटे माणसांसोबत जीवन जगू शकतील का?

मी दिलेला सल्ला शरद पवारांच्या पचनी पडेल का? उद्धव ठाकरे यांनी मारला टोमणा

अमेरिकेत अंदाधुंद गोळीबाराची आणखी एक घटना; एक ठार

खेळाडू आणि पोलिसांत धुमश्चक्री उडाल्याच्या वृत्ताबद्दल तुषार मेहता यांनी सांगितले की, एका राजकीय पक्षाच्या नेत्यांना उघडझाप होणारे पलंग तिथे आणले होते. पण पोलिसांनी त्यांना आंदोलनस्थळी प्रवेश करू दिला नाही. त्यामुळे पोलिस दारू प्यायले होते असा आरोप करण्यात आला पण पोलिसांची यासंदर्भात तपासणी केल्यावर तसे काहीही नसल्याचे समोर आले. खेळाडूंचे वकील नरेंद्र हूडा यांनी या सगळ्या चौकशीवर देखरेख ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली होती. पण न्यायालयाने ती फेटाळून लावली

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,018अनुयायीअनुकरण करा
75,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा