28 C
Mumbai
Monday, July 20, 2026
घरस्पोर्ट्सझिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना

'बेबी बॉस' वैभव सूर्यवंशीकडे सर्वांचे लक्ष

Google News Follow

Related

इंग्लंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरी मागे टाकत भारतीय टी-२० संघ आता नव्या उत्साहाने जिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि जिम्बाब्वे यांच्यात २३ जुलैपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका रंगणार असून, त्यासाठी भारतीय संघ १९ जुलै रोजी जिम्बाब्वेला रवाना झाला. या मालिकेत सर्वाधिक लक्ष १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लागले आहे. इंग्लंड दौऱ्यात अपेक्षित छाप पाडण्यात तो अपयशी ठरला असला, तरी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत दमदार पुनरागमन करण्याची त्याच्याकडून चाहत्यांना मोठी अपेक्षा आहे.

नियमित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर इंग्लंडमध्ये व्यस्त असल्यामुळे या दौऱ्यासाठी भारतीय संघाची धुरा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. लक्ष्मण हंगामी मुख्य प्रशिक्षक म्हणून संघासोबत झिम्बाब्वेला रवाना झाले आहेत. दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर असलेले कर्णधार श्रेयस अय्यर, ईशान किशन, शिवम दुबे, हर्ष दुबे आणि प्रिन्स यादव हे खेळाडू थेट जिम्बाब्वेमध्ये संघात सामील होणार आहेत.
हे ही वाचा:
फेसबुकवर ‘रशियन’ तरुणीची मैत्री पडली महागात

कुणाल कामरा व प्रकाश राज यांच्यावर गुन्हा दाखल करा !

अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावरील पाडकामाला स्थगिती

स्वित्झर्लंडमध्ये बसमधून उतरून चालकाने पढला नमाज, प्रवासी राहिले ताटकळत

भविष्यातील मजबूत टी-२० संघ उभारण्याच्या दृष्टीने निवड समितीने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. यश ठाकूर आणि अशोक शर्मा यांची प्रथमच भारतीय संघात निवड झाली असून, मयंक यादव आणि रिंकू सिंह यांच्या पुनरागमनाकडेही क्रिकेटप्रेमींचे विशेष लक्ष असेल. तसेच हर्ष दुबे आणि प्रभसिमरन सिंग यांना या मालिकेत टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताचा युवा आणि आक्रमक संघ झिम्बाब्वेविरुद्ध विजयी सलामी देण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. तीनही सामने हरारे येथे खेळवले जाणार असून, पहिला सामना २३ जुलै, दुसरा २५ जुलै आणि तिसरा २६ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ४.३० वाजता सुरू होईल. युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही मालिका मोठी संधी मानली जात असून, विशेषतः वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा