27.3 C
Mumbai
Saturday, July 4, 2026
घरस्पोर्ट्सअभिषेक शर्माची विक्रमी फटकेबाजी

अभिषेक शर्माची विक्रमी फटकेबाजी

Google News Follow

Related

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र, या सामन्यात भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने केलेल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इंग्लंडच्या भूमीवर भारताकडून सर्वात वेगवान टी-20 अर्धशतक झळकावण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला.

अभिषेकने अवघ्या २४ चेंडूत ५९ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ४ षटकार लगावत तब्बल २४५ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने केवळ २० चेंडूत अर्धशतक पूर्ण करत के.एल. राहुलचा विक्रम मोडीत काढला. राहुलने २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध २७ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.

इंग्लंडविरुद्धचा अभिषेकचा शानदार फॉर्म कायम असून, या संघाविरुद्धच्या ७ टी-20 डावांत त्याने २१९ च्या स्ट्राइक रेटने ३४७ धावा केल्या आहेत.

भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर यानेही दमदार फलंदाजी करत ४७ चेंडूत ६८ धावा केल्या. त्याच्या खेळीत ६ चौकार आणि १ षटकार होता. मात्र, संजू सॅमसन पुन्हा अपयशी ठरला. तो ७ चेंडूत केवळ १ धाव करून बाद झाला. ईशान किशन धावफलक न उघडताच धावबाद झाला, तर तिलक वर्मा १३ धावांवर माघारी परतला.

अखेरीस शिवम दुबे याने २१ चेंडूत नाबाद ४२ धावांची आक्रमक खेळी करत भारताची धावसंख्या वाढवली. त्याने २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २०० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली.

भारताने निर्धारित २० षटकांत ७ बाद १८९ धावा उभारल्या. मात्र, भारतीय डाव संपल्यानंतर मुसळधार पावसामुळे इंग्लंडचा डाव सुरू होऊ शकला नाही आणि सामना अखेर रद्द करण्यात आला.

आता मालिकेतील दुसरा टी-20 सामना ४ जुलै रोजी मँचेस्टर येथे खेळविण्यात येणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
319,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा