27.9 C
Mumbai
Wednesday, June 24, 2026
घरस्पोर्ट्सश्रेयंका पाटील महिला टी-२० विश्वचषक २०२६ मधून बाहेर

श्रेयंका पाटील महिला टी-२० विश्वचषक २०२६ मधून बाहेर

टखन्याच्या दुखापतीमुळे माघार; प्रेमा रावतची संघात एन्ट्री

Google News Follow

Related

महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सलग दोन दणदणीत विजयांसह विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाची प्रमुख फिरकीपटू आणि मधल्या षटकांमध्ये प्रतिस्पर्ध्यांना जखडून ठेवणारी श्रेयंका पाटील दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडली आहे.

नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात ही दुर्दैवी घटना घडली. पॉवरप्लेतील अखेरचे षटक टाकताना श्रेयंकाचा टखना अचानक वाकला आणि ती वेदनेने मैदानावरच कोसळली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन वैद्यकीय पथक तातडीने मैदानात दाखल झाले. अखेर तिला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावे लागले. त्यानंतर ती पुन्हा गोलंदाजीसाठी मैदानात परतू शकली नाही.

वैद्यकीय तपासणीनंतर श्रेयंकाला पुढील सामने खेळणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आणि भारतीय संघ व्यवस्थापनाने तिच्या जागी २४ वर्षीय लेगस्पिनर प्रेमा रावत हिला संघात संधी दिली आहे.

प्रेमा रावत ही भारतीय महिला क्रिकेटमधील उदयोन्मुख खेळाडू मानली जाते. महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना तिने आपली क्षमता दाखवून दिली आहे. उत्तराखंडला वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्यातही तिचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे आता या तरुण गोलंदाजीकडून भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

दरम्यान, भारतीय संघाचा विश्वचषकातील प्रवास आतापर्यंत शानदार राहिला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने ६४ धावांनी दमदार विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सला ९५ धावांनी पराभूत करत आपली ताकद दाखवून दिली.

नेदरलँड्सविरुद्ध भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २०९ धावांचा डोंगर उभा केला. स्मृती मंधानाने ४७ चेंडूत ७४ धावांची आकर्षक खेळी साकारली, तर शेफाली वर्माने ३८ चेंडूत ५५ धावांची तुफानी खेळी करत भारतीय डावाला वेग दिला. गोलंदाजीत श्री चरणीने १९ धावांत ४ बळी घेतले, तर शेफालीनेही ३ बळी मिळवत अष्टपैलू कामगिरी केली.

मात्र, सलग विजयांच्या आनंदात असतानाच श्रेयंकाच्या दुखापतीने भारतीय संघाला मोठा धक्का दिला आहे. आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात तिची उणीव नक्कीच जाणवणार आहे. आता प्रेमा रावत ही संधी कितपत साधते आणि भारतीय संघ विजयी घोडदौड कायम ठेवतो का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
317,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा