27.4 C
Mumbai
Monday, July 6, 2026
घरस्पोर्ट्समेसीच मेसी! विश्वचषकात माराडोनाचा विक्रमही धुळीस

मेसीच मेसी! विश्वचषकात माराडोनाचा विक्रमही धुळीस

सर्वाधिक असिस्टचा विश्वविक्रम करत माराडोनालाही टाकले मागे

Google News Follow

Related

फीफा विश्वचषक २०२६ मध्ये अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेसी दमदार फॉर्ममध्ये असून, प्रत्येक सामन्यात नवा इतिहास रचत आहे. राऊंड ऑफ ३२ मधील काबो व्हर्डेविरुद्धच्या सामन्यात मेसीने आणखी एका मोठ्या विक्रमावर आपले नाव कोरले. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक असिस्ट (गोलसाठी निर्णायक पास) करणारा खेळाडू बनण्याचा मान आता मेसीच्या नावावर जमा झाला आहे.

मेसीने या सामन्यात आपल्या विश्वचषक कारकिर्दीतील ९ वा असिस्ट नोंदवत अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू डिएगो माराडोना यांचा ८ असिस्टचा विक्रम मागे टाकला. याचबरोबर विश्वचषकाच्या इतिहासात सलग ८ सामन्यांत गोल करणारा पहिला खेळाडू होण्याचाही मान मेसीने मिळवला.

काबो व्हर्डेविरुद्धच्या सामन्यात मेसीने २९ व्या मिनिटाला लिसांद्रो मार्टिनेझच्या अचूक पासवर गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. हा मेसीच्या विश्वचषकातील २० वा गोल ठरला. विश्वचषकात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम यापूर्वीच मेसीच्या नावावर आहे. तसेच दोन वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये प्रत्येकी ७ गोल करणारा तो पहिलाच फुटबॉलपटू ठरला आहे.

हेही वाचा :

“ही खऱ्या बंधुत्वाची भावना”; व्हेनेझुएलाकडून भारताचे आभार

अमेरिकेतील एका अहवालाने फिरवला सोन्याचा गेम

बँक ऑफ बडोदा आणि जीआयसी हाऊसिंग फायनान्सवर RBIचा दंड

‘आमचाच गट खरा’ म्हणत ऋतुव्रत बॅनर्जी यांनी घेतला तृणमूल मुख्यालयाचा ताबा

विश्वचषक २०२६ मध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही मेसी अव्वल स्थानावर आहे. फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर किलियन एम्बाप्पे ६ गोलांसह त्याला कडवी टक्कर देत आहे.

दरम्यान, अर्जेंटिनाला काबो व्हर्डेविरुद्ध विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. निर्धारित ९० मिनिटांनंतर सामना २-२ असा बरोबरीत होता. मात्र अतिरिक्त वेळेत काबो व्हर्डेचा खेळाडू डिने बोर्गस याने मेसीचा शॉट रोखण्याच्या प्रयत्नात चेंडू स्वतःच्याच जाळ्यात ढकलला. या आत्मघातकी गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने ३-२ असा थरारक विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीकडे दमदार वाटचाल केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
319,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा