27.5 C
Mumbai
Friday, July 11, 2025
घरस्पोर्ट्सनाशकात राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात

नाशकात राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात

Google News Follow

Related

महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन आणि नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डी. एस. एफ. स्पोर्ट्स फौंडेशन यांच्या सहकार्याने नाशिकच्या पंचवटी येथील स्व. मीनाताई ठाकरे, विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित ७ व्या चाईल्ड काप आणि १३ व्या मिनी गटाच्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला आज मोठ्या उत्साहात सुरवात झाली.

या स्पर्धेचे उदघाटन आशियाई तलवारबाजी असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सिग्नेचर इंटरनॅशनल फूड लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर यतीन पटेल, नाशिक जिल्हा ऑल गेम्स असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे मार्गदर्शक अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे सचिव डॉ. उदय डोंगरे, छत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना राजीव मेहता यांनी सांगितले की, भारताच्या खेळाडूंना मोठी मजल गाठण्यासाठी या चाईल्ड आणि मिनी वयोगटाच्या स्पर्धाना विशेष महत्व आहे. कारण या वयापासून खेळाडूंनी आपल्या खेळामध्ये सातत्य राखून प्रगती केल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय आणि थेट ऑलीम्पिक पर्यंतची मजल गाठणे शक्य आहे असे सांगितले.

चाईल्ड (१० वर्षे) आणि मिनी (१२ वर्षे) या वयोगटापासून खेळण्याचे महत्व लक्षात घेऊन खेळाडूंच्या प्रगतीच्या उद्देशांनेच या दोन गटांच्या स्पर्धचे प्रथम नाशिकमध्येच १३ वर्षापूर्वी शुभारंभ करण्यात आला होता. या स्पर्धेत भारताच्या विविध राज्यांचे ३९० खेळाडू सहभागी झाले आहेत. यांमध्ये महाराष्ट्रसह जम्मू – काश्मीर, पंजाब, हरियाणा , तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, दीव – दमण, मणिपूर, आसाम, बिहार, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, ओरिसा, पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ आदि राज्यांचा समावेश आहे.

उदघाटनानंतर प्रत्यक्ष स्पर्धांना सुरुवात झाली. तलवारबाजीमध्ये अंतर्भाव असलेल्या सॅबर, फॉईल आणि ई. पी. या तीन प्रकारात स्पर्धा खेळविली जात आहे. यामध्ये प्रथम गटवार साखळी पद्दतीने सामने खेळविले जात असून त्यानंतर प्रत्येक गटामधील पहिल्या दोन क्रमांकाच्या खेळाडूंना बाद फेरीमध्ये प्रवेश मिळणार आहे.

आज खेळल्या गेलेल्या १० वर्षे मुलींच्या ई. पी. प्रकारात आंध्र प्रदेशच्या खेळाडूंनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून सुवर्ण आणि रौप्य पदकाला गवसणी घातली. तनिष्का गुंडू आणि रेवा पाटील यांनी ही सुवर्ण आणि रौप्य कामगिरी केली. या प्रकारात महाराष्ट्राच्या साई पाटील आणि वसुधा साठे यांनी संयुक्तं कास्य पदक मिळविले.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष दत्त पाटील, सचिव राजू शिंदे, दीपक निकम, अशोक कदम, उदय खरे, जय शर्मा, आनंद चकोर, राहुल फडोळ, प्रसाद परदेशी, अविनाश वाघ, आणि सर्व सहकारी प्रयत्नशील आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा