छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात शनिवारी (५ जुलै) सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. दंतेवाडा-विजापूर सीमेवरील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी शोधमोहीम राबवत असताना ही चकमक सुरू झाली.
गुप्त माहितीच्या आधारे नक्षलवाद्यांची उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. शोध मोहिमेदरम्यान जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि दोन शस्त्रे जप्त केली आहेत.
बिजापूर पोलिस आणि बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी सांगितले की, शोध मोहीम सुरू आहे आणि सुरक्षा दल परिसर पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पावसाळ्यातही नक्षलवाद्यांविरुद्धची मोहीम पूर्ण ताकदीने सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.
हे ही वाचा :
नॅशनल हेराल्ड प्रकरण: राहुल गांधींनी मांडले युक्तिवाद, पुढे काय झाला वाचा
लालू यादव १३ व्यांदा राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले
मराठीसाठी एकाची तळमळ तर दुसऱ्याची सत्तेसाठी मळमळ!
डोक्याला घोडा लावून वाटाघाटी नकोत; २टक्क्यांचा माज सहन करणार नाही
केंद्र सरकारने देशातून नक्षलवाद संपवण्यासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत दिली आहे. छत्तीसगडमधील सुरक्षा दल सतत सक्रिय आणि माओवाद्यांच्या धोक्याचे उच्चाटन करण्यासाठी गुंतलेले आहेत. आतापर्यंत अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे, ज्यामध्ये अनेक नक्षल कमांडरचा समावेश आहे. सुरक्षा दलाची कारवाई पाहून अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, करत आहेत.
