आईपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्सचं प्रदर्शन अपेक्षेप्रमाणे झालं नाही. पराभवांच्या मालिकेनंतर संघ आता नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभा आहे. पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न गोंधळ घालत आहे – धोनी आता पुढे खेळेल का? की हा IPL त्याचा शेवटचा होता?
संजय बांगार यांचं वक्तव्य मनाला चटका लावणारं होतं –
“मी धोनीच्या जागी असतो, तर मी म्हणालो असतो – बस, आता खूप झालं…”
धोनीने क्रिकेटला जे दिलं, ते शब्दात मावणार नाही. विश्वचषक जिंकवला, अनेक अनसंग हिरोंना संधी दिली, आणि चेन्नई सुपर किंग्सला ५ वेळा चॅम्पियन बनवलं. पण आता जेव्हा तो ४३ वर्षांचा आहे, तेव्हा चाहत्यांनाही जाणवतंय – त्याचं शरीर आता थकतंय, पण त्याची इच्छाशक्ती अजूनही प्रचंड आहे.
परंतु, कधीकधी महानायक स्वतःहून मागे हटतो… जेणेकरून नव्या चेहऱ्यांना पुढे जाता येईल.
धोनीचं मैदानावरचं शांत नेतृत्व, शेवटच्या षटकात धडधडणारं त्याचं हेलिकॉप्टर शॉट, आणि त्याच्या चेहऱ्यावरचं न कधी बदलणारं आत्मविश्वासाचं हास्य – हे आता आठवणीत साठवायचं वेळ आलीये, असं वाटतं.
CSK आता नव्या पिढीकडे वळणार आहे. डेवाल्ड ब्रेविस, नूर अहमद, मथीशा पथिराना यांसारखे तरुण संघात उभे राहत आहेत. अशा वेळी धोनीसारख्या लिजेंडने सन्मानाने बाजूला होणं – हेच खऱ्या नेतृत्वाचं लक्षण.
थाला, तू आमच्यासाठी फक्त कॅप्टन नव्हतास, तू भावना होतास. मैदानावर उभा असलेला तुझा तो शांत चेहरा, आमच्या लहानपणाचा आधार होता. पण आता वेळ आली आहे, तुझं ‘गोल्डन गुडबाय’ स्वीकारण्याची…”
धन्यवाद धोनी… क्रिकेट तुला कधीच विसरणार नाही!
हेही वाचा :
छत्तीसगड आणि झारखंडमधील मद्यघोटाळ्यांचे धागेदोरे एकमेकांशी जोडलेले
ज्योती मल्होत्राने तोंड उघडले; पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील व्यक्तीशी होता संपर्क







