पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला संपूर्ण जगभरात एक विशेष ओळख मिळवून दिली आहे, असे मत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, योग हा भारताने संपूर्ण जगाला दिलेला एक अमूल्य वारसा आहे आणि आज जगभरातील जवळपास सर्व देश योग कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. मुख्यमंत्री नायडू यांनी स्पष्ट केले की, योग हा केवळ काही लोकांपुरता किंवा काही ठिकाणांपुरता मर्यादित नाही, तर तो सर्वांसाठी आहे.
या सर्व गोष्टी त्यांनी ‘योगांध्र २०२५’ या संपूर्ण राज्यव्यापी योग मोहिमेच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितल्या. ही मोहीम एक महिनाभर चालणार आहे आणि तिचा समारोप २१ जून रोजी विशाखापट्टणममध्ये होणाऱ्या ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाने होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री नायडू यांनी ‘योगांध्र’ या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन केले आणि सर्व नागरिकांना योग आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन केले.
हेही वाचा..
“थाला, आता विश्रांती घे…! संपूर्ण भारत तुझं ऋणी आहे”
छत्तीसगड आणि झारखंडमधील मद्यघोटाळ्यांचे धागेदोरे एकमेकांशी जोडलेले
ज्योती मल्होत्राने तोंड उघडले; पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील व्यक्तीशी होता संपर्क
मुर्शिदाबाद : पश्चिम बंगाल पोलिसांवर गंभीर आरोप
त्यांनी सांगितले की, योगामुळे मानसिक तणाव दूर होतो आणि हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम किंवा फोटो काढण्याचा प्रसंग नसून, जीवनात मोठे परिवर्तन घडवणारा एक अभ्यास आहे. त्यामुळे आपल्याला तो आपल्या दिनचर्येत समाविष्ट करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी जाहीर केले की, ‘योगांध्र’ मोहिमेत किमान २ कोटी नागरिकांनी सहभागी होण्याचे लक्ष्य आहे आणि त्यामध्ये १० लाख नागरिकांना प्रमाणपत्रे दिली जातील.
ते पुढे म्हणाले की, राज्यातील सर्व शाळांमध्ये दररोज एक तासाचा योग सत्र आयोजित केला जाईल. २१ जून रोजी विशाखापट्टणममध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात ५ लाख नागरिक सहभागी होतील, अशी योजना आखण्यात आली आहे. हा कार्यक्रम आर. के. बीचपासून भोगापुरमपर्यंतच्या परिसरात होईल. राज्य सरकारचे उद्दिष्ट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, असे आहे — म्हणजे एका ठिकाणी सर्वाधिक लोकांनी एकत्र योग करणे. विशाखापट्टणममध्ये यासाठी २.५ लाख नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे.
२०२३ साली सूरतमध्ये १.५३ लाख लोकांनी एकत्र येऊन योग केला होता आणि तेव्हा नवीन विक्रम नोंदवला गेला होता. आंध्र प्रदेश सरकार आता यापेक्षा मोठा विक्रम करण्याच्या तयारीत आहे. आर. के. बीचपासून भीमुनिपटनम बीचपर्यंत २.५ लाख लोकांची योगासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की ६८ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे, जिथे २,५८,९४८ लोक एकत्र योग करू शकतील अशी क्षमता आहे. मुख्यमंत्र्यांनी सूचना केली की, आर. के. बीचपासून श्रीकाकुलमपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावरील सर्व योग्य स्थळी योग सत्रांचे आयोजन करून ५ लाख लोकांची सहभागिता निश्चित करावी.
