32.3 C
Mumbai
Monday, May 11, 2026
घरस्पोर्ट्सवाद, नोटीस आणि बंदी... तरीही विनेश फोगाट ठाम

वाद, नोटीस आणि बंदी… तरीही विनेश फोगाट ठाम

Google News Follow

Related

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवरही दिग्गज महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने आपला लढा सुरूच ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत विनेशने लिहिले, “आयुष्य एखाद्या खोल भोवऱ्यात अडकल्यासारखं वाटतंय. जग सतत माझ्या व्यक्तिमत्त्वात उणिवा शोधत राहतं. पण आयुष्याने नेहमीच माझं मस्तक उंच ठेवलं आहे. कोणत्याही तलवारीत इतकी ताकद नाही की ती मला झुकवू शकेल.” या शब्दांतून तिने सर्व अडचणींना सामोरे जात पुन्हा उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

डब्ल्यूएफआयने विनेशला शिस्तभंग आणि अँटी-डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. तसेच तिला २६ जूनपर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास अपात्र घोषित करण्यात आले आहे.

डब्ल्यूएफआयने दिलेल्या १५ पानी नोटिशीत असा आरोप करण्यात आला आहे की, निवृत्तीनंतर पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना लागू असलेल्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या अँटी-डोपिंग नियमांनुसार आवश्यक असलेली सहा महिन्यांची नोटीस कालावधी विनेशने पूर्ण केलेला नाही. त्यामुळे दोन वेळा विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या या खेाडूला पुनरागमनासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नोटिशीत पुढे म्हटले आहे की, पॅरिस ऑलिम्पिक वादादरम्यान विनेशच्या कृतींमुळे भारतीय कुस्तीची प्रतिमा कायमस्वरूपी डागाळली गेली. तसेच डब्ल्यूएफआयच्या संविधानाचे, यूडब्ल्यूडब्ल्यू यूडब्ल्यूडब्ल्यू आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमांचे आणि अँटी-डोपिंग मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा :

दुर्मिळ पक्ष्यांच्या शोधात गेले… आणि ठरले हंता व्हायरसचे ‘पेशंट झिरो’!

वादग्रस्त हुमायून कबीर आता नवे मुख्यमंत्री शुभेंदूना देतायत धमकी

स्पेनमध्ये पोहोचले हंताव्हायरसग्रस्त लक्झरी क्रूझ जहाज

फ्रीजमध्ये वस्तू उघड्या ठेवताय? आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकते ही सवय?

दरम्यान, रविवारी गोंडा येथे सुरू होणाऱ्या नॅशनल ओपन रँकिंग स्पर्धेतून विनेश पुनरागमन करणार होती. मात्र, या कारवाईमुळे तिच्या पुनरागमनाला ब्रेक लागला आहे.

विनेशने २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीपूर्वी वजन अधिक भरल्यामुळे अपात्र ठरल्यानंतर निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर नुकतेच तिने देशासाठी पुन्हा जागतिक स्तरावर पदक जिंकण्याच्या उद्देशाने कुस्तीत पुनरागमन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, आता तिच्या पुनरागमनासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा