24 C
Mumbai
Wednesday, February 11, 2026
घरस्पोर्ट्सचार वर्षांनंतर आयसीसी वनडे रँकिंगमध्ये विराट कोहली पुन्हा अव्वल

चार वर्षांनंतर आयसीसी वनडे रँकिंगमध्ये विराट कोहली पुन्हा अव्वल

जुलै २०२१ नंतर पहिल्यांदाच कोहलीने पहिल्या क्रमांकावर जागा पटकावली

Google News Follow

Related

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) च्या ताज्या वनडे फलंदाजी रँकिंगमध्ये भारतीय फलंदाज विराट कोहली चार वर्षांनंतर पुन्हा एकदा अव्वल स्थानावर पोहोचला आहे. जुलै २०२१ नंतर पहिल्यांदाच कोहलीने पहिल्या क्रमांकावर जागा पटकावली आहे. न्यूझीलंडविरुद्ध वडोदऱ्यात खेळलेल्या पहिल्या वनडेमध्ये ९१ चेंडूंमध्ये केलेल्या ९३ धावांच्या सामनाविजयी खेळीनंतर ही झेप विराट कोहलीने घेतली आहे. तसेच या रँकिंगमध्ये त्याने भारताचा फलंदाज रोहित शर्मा याला मागे टाकले आहे.

अलीकडच्या महिन्यांत कोहलीचा वनडे फॉर्म विलक्षण राहिला आहे. ऑक्टोबरमध्ये पुनरागमन केल्यानंतर त्याने सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोव्हेंबर- डिसेंबरमधील घरच्या मालिकेत त्याने १३५ आणि १०२ धावांची शतके झळकावली, तर एका सामन्यात तो ६५ धावा करून नाबाद राहिला. त्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या वनडेमध्येही कोहलीने नाबाद ७४ धावांची संयमी खेळी केली होती.

आकडेवारी पाहिल्यास, कोहलीने सलग पाच डावांत ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या पाच सामन्यांत त्याने एकूण ४६९ धावा केल्या असून, त्यात दोन शतके आणि तीन अर्धशतके समाविष्ट आहेत. या दमदार फॉर्मच्या जोरावर तो ७८५ रेटिंग गुणांसह वनडे फलंदाजी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. वनडे रँकिंगमध्ये विराट कोहली ११ व्यांदा नंबर एक वर पोहचला आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये त्याने पहिल्यांदा हा मान मिळवला होता.

हे ही वाचा..

अमेरिका ग्रीनलँड ताब्यात घेणार? नव्या विधेयकामुळे खळबळ

इस्रायलचा संयुक्त राष्ट्रांच्या सात एजन्सींमधून बाहेर पडण्याचा निर्णय

१५ उपग्रह हरवले पण ‘KID’ बचावला; तीन मिनिटे अवकाशातून पाठवली माहिती

थायलंडमध्ये रेल्वेवर क्रेन कोसळून झालेल्या अपघातात २२ जणांचा मृत्यू

दरम्यान, न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल यानेही रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. पहिल्या वनडेमध्ये ८४ धावांची खेळी केल्यानंतर तो ७८४ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रोहित शर्मा आता ७७५ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. अव्वल तीन फलंदाजांमध्ये केवळ १० गुणांचा फरक असल्याने, येत्या काळात ही शर्यत आणखी रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. इतर भारतीय खेळाडूंमध्ये, यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुल एका स्थानाची झेप घेत ११ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने वनडे गोलंदाजी रँकिंगमध्ये पाच स्थानांची सुधारणा करत १५ वा क्रमांक मिळवला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा